प्रभाग २६ मधील गणेश बिल्डर सोसायटी येथील समस्यांचे झाले निरसन…
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि ३ ऑगस्ट – शहरातील प्रभाग २६ मधील गणेश बिल्डर सोसायटी येथे पावसामुळे रस्ते चिखलमय झाले होते. पाण्याचा निचरा होत नव्हता त्यावेळी तेथील रहिवासी तथा भाजपा सोलापूर शहर सरचिटणीस गीता पाटोळे यांनी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना सदर समस्या बाबतीत समक्ष पाहणी करण्यास सांगितले असता नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी सदरच्या समस्या जाणून घेत सदर कामाची दखल घेऊन सोलापूर महानगरपालिका नगर अभियंता सारीका अकुलवार यांना कळविले होते त्याची दखल घेत लगेच जेसीबी पाठवून दिला. तेथील पाण्याचा निचरा व्यवस्थितपणे करून देऊन वाढलेली झाडे झुडपे जेसिपीच्या सहाय्याने काढून देऊन मुरूम टाकून व्यवस्थित पसरून रस्ता खुला करून दिला त्यामुळे येथील नागरिकांनी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे आभार मानले. यावेळी भाजपा सोलापूर शहर सरचिटणीस गीता पाटोळे, भाजपाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण,अनुराधा गावडे, कुलकर्णी काकू,अश्विनी गावडे,गवळी काकू,नंदू जोशी,विकास पाटोळे,मंगला बनकर,आवेश शेख,जयकुमार माळी आदींची उपस्थित होती.