सोलापूर शहरातील दोन्ही उड्डाणपुलांची निविदा प्रसिद्ध अखेर आ. विजय देशमुख यांच्या प्रयत्नाला यश….
११०० कोटी रुपये खर्चून दोन उड्डाणपूल उभारण्यात येणार
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि १९ ऑगस्ट – मागील अनेक वर्षांपासून जुना पुणे नाका ते सात रस्ता आणि पत्रकार भवन विजापूर रोड ते बोरामणी नाका या दोन्ही उड्डाणपूलाचे काम रखडले होते सोलापूर शहरातील वाहतुकीची विचार करता उड्डाणपूल होणे अत्यंत गरजेचे होते.आमदार विजय देशमुख हे उड्डाणपूल होण्यासाठी सतत केंद्रीय सडक व परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा करत होती. त्या पाठपुरावाला यश आले असून दोन्ही उड्डाणपुलाच्या कामांची निविदा प्रक्रिया प्रसिद्ध झाली आहे.
आमदार विजय देशमुख यांच्या सातत्यपूर्ण केलेल्या मागणीला यश आले आहे. उड्डाणपूलाच्या भुसंपादणासाठी वाढीव ३०० कोटी रुपयांची गरज होती. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता उड्डाणपूलासाठी भुसपादनास अडथळे येत होते भुसंपादणासाठी लागणारी वाढिव रक्कम राज्य शासानाने द्यावी अशी मागणी आ. विजय देशमुख यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लावून धरली होती. देवेंद्र फडणवीस यांनी लागलीच भूसंपादनासाठी लागणारी रक्कम उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. बोलल्याप्रमाणे भूसंपादनासाठी लागणारी रक्कम राज्य शासनाने महापालिकेकडे वर्ग करत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून आता उड्डाणपुलाचे काम सुरू होण्याच्या अनुषंगाने पहिले पाऊल म्हणून निविदा प्रसिद्ध झाली आहे सप्टेंबर महिन्यापर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला ऑक्टोंबर महिन्यामध्ये सुरुवात होणार आहे याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश आल्यामुळे आमदार विजय देशमुख यांनी समाधान व्यक्त केलं आहे.
निवडणूकीत जे आश्वासन दिले ते पुर्ण होत असल्याचा मनस्वी आनंद…..
सोलापूर शहरात उड्डाणपूल होणे अत्यंत गरजेचे होते सतत सोलापूर शहरात होत असलेली वाहतूक कोंडी यावर मार्ग काढण्यासाठी व शहराच्या विकासासाठी शहरात उड्डाणपूल होणे गरजेचे होते मी पालकमंत्री असताना या उड्डाणपूलास मान्यता मिळाली होती. परंतु काही प्रशासकीय तांत्रिक अडचणी मुळे हे काम सुरू होण्यास विलंब झाला परंतु सर्व अडचणीवर मात करत आज या उड्डाणपूल उभारण्याच्या कामांची निविदा प्रक्रिया प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात या कामास सुरुवात होणार आहे. मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकार हे विकासाभिमुख सरकार आहे निवडणूकीत जे आश्वासन दिले ते पुर्ण होत असल्याचा मनस्वी आनंद होत आहे.
– वियजकुमार देशमुख, आमदार