सोलापूर शहरातील सोलगीं नगर भागात गेल्या तीन दिवसांपासून वानरांचा उच्छाद ;
वनविभागाने वानरांना कोणीतीही वस्तू खाण्यास न दिल्याचा सल्ला……
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर , दि. २० सप्टेंबर – सोलापूर शहरातील हद्दवाढ भागातील कुमठा नाका परिसरातील म्हेत्रे वस्ती येथील सोलगी नगरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून वानरांनी उच्छाद मांडला आहे. गेल्या तीन दिवस दररोज सकाळी सात वाजता तीन ते चार वानर नागरिकांच्या घरावर उड्या मारत येत आहेत. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लहान मुलांना शाळेला ये – ने जाणे यामुळे अवघड बनले आहे.

वानर घरावरून खाली जमिनीवर येत आहेत. तर कुत्रे त्यांच्या मागे लागत आहेत. त्यामुळे या वानरांचे कुत्र्यांपासून संरक्षण होणे सुद्धा महत्त्वाचे बनले आहे. वानरांना खाण्यासाठी मिळत असल्याने ते तीन ते चार वानर लोकवस्तीमध्ये येत आहेत. नागरिकांनी या वानरांना खाऊ घालू नये. तरच ते लोकवस्तीत येण्याचे बंद होतील असे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
नागरिकांनी वानरांना खाऊ घालू नये..
कुमठा नाका सोलगी नगर परिसरातील लोकवस्तीत आलेल्या तीन ते चार वानरांना नागरिकांनी कोणतीही खाद्यपदार्थ अथवा फळे खाऊ घालू नये. त्यांना दररोज अशा वस्तू खायला मिळत असल्याने ते लोक वस्तीमध्ये येतात. वानरांचा वावर अशा ठिकाणी वाढतो. त्यामुळे वानरांना फळे किंवा विविध खाद्यपदार्थ देऊ नये.
– श्री पाटील , अधिकारी वन विभाग सोलापूर.