सोलापूर शहरातील ज्येष्ठ नागरिकांना असे वाटते की सोलापूर शहरात जन्म घेऊन आम्ही चुकलो की काय..?
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१० जानेवारी
सोलापूर शहरातील व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी हे कुचकामी ठरत आहेत.जनता त्यांना भरभरून मतदान करून निवडून दिलेत. परंतु ते स्वतःचच स्वमंगल करून घेत आहेत.मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपण यांना मतदान करून निवडून दिलेत हे कशासाठी..? लुटून खाण्यासाठी का..?जनतेच्या हिताची कामे जर होत नसेल तर ह्यांना घेऊन जाळायचं का..? सोलापुरातील जनतेला एक सांगायचं आहे की तुम्ही फक्त यांच्या खोट्या नाट्या आश्वासनाला बळी पडून स्वतःचे व आपल्या मुलाबाळांचे भविष्य अंधारात घेऊन जात आहात यावरून सिद्ध होत आहे.
विधानसभा निवडणुकीत आपण घेतलेला अनुभव पाहता असे लक्षात आले की सर्वजण मिलीभगत आहेत. प्रशासनाच्या बाबतीत सांगायला नको त्यांच्यावर कोणाचेच अंकुश नाही ह्या तोऱ्यात वावरत आहेत. जणू काही आम्हीच ह्या शहराचे मालक आहोत अशा तोऱ्यात फिरत आहेत.
देशाचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार बांधवांनी यांनी प्रशासनाची मनमानी कारभार,फक्त कागदोपत्री दाखवून शासनाचा करोडो रुपये लाटत आहे हे निदर्शनास आणून देऊन यांना यांची लायकी दाखवून द्यावी, पण तसे होताना दिसत नाही. त्यांच्यावर देखील मोठा दबाव टाकला जात आहे. गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते. अशावेळी त्यांच्यापुढे सत्य व असत्याचा प्रश्न उभा राहतो,
सोलापूर महापालिकेच्या आयुक्त मॅडम शासन दरबारी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून आणत आहेत परंतु खालचे अधिकारी व कर्मचारी हे ठेकेदारांना हाताशी धरून निकृष्ट दर्जाची कामे करून शासनाचा निधी लाटत आहेत हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत आणि फक्त बघतच राहणार का..? याचे अनेक उदाहरण आहेत.
१) जुळे सोलापूरातील पाण्याची टाकी ते बॉम्बे पार्क जाणारा रस्ता केवळ सहा महिन्यातच उखडून गेला आहे जागोजागी खड्डे पडलेले आहे त्यामुळे शासनाचा जवळपास एक करोड दहा लाखाचा निधी अधिकारी व ठेकेदार यांनी संगनमत करून निकृष्ट दर्जाचे काम करून अक्षरशः गिळून घेतला.
२) जुळे सोलापुरातील जुना आय.एम.एस. कॉलेज पासून ते सैफुलला जाणाऱ्या रोडची पण तीच अवस्था झाली असून जागोजागी खड्डे पडलेले आहेत.
३) आसरा ब्रिज ते विजापूर रोडला जोडणारा रस्ता तर सांगायलाच नको एवढे खड्डे पडलेत की सांगायला आणि महानगरपालिका यांच्या बाबतीत सांगायलाच नको सोलापूर शहरातील सात रस्ता असो, नवी पेठ पोलीस चौकी येथे चांगले रस्ते असताना सुद्धा तेथेच वेळोवेळी डांबरीकरण करत आहे. मग जुळे सोलापुरातील आसरा ब्रिज ते विजापूर रोडला जोडणारा रस्ता, सैफुल ते बॉम्बे पार्क जाणारा रस्ता ह्या रस्त्यावर डांबरीकरण का होत नाही..?
जुळे सोलापुरातील नागरिकांनी कुठले पाप केले आहेत म्हणून त्यांना नरक यातना भोगण्यासाठी वाऱ्यावर सोडून दिलेले आहे. आयुक्त मॅडम एकदा आपल्या AC दालनात बसण्यापेक्षा जुळे सोलापूरातील काय व्यथा आहे किती नरक यातना भोगत आहे हे समक्ष पाहणी केल्यानंतर समजेल.हेच काम जर इस्टिमेट प्रमाणे केले असते तर ही नौबत आली नसती ह्याला जबाबदार कोण..?
सोलापूरची जनता संयमी असून त्याचाच फायदा प्रशासन घेत आहे. हे कुठेतरी थांबायला पाहिजे नाहीतर हे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन आपल्या हक्काचा जमा झालेला टॅक्स स्वरूपातला पैसा मिलीभगत करून लुटून खातील हे आपण उघड्या डोळ्यांनी फक्त बघत राहणार आहात काय..?सांगण्याचं तात्पर्यकी..अशा भ्रष्टाचारी यांना वेळीच आवर घालून त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी तरच आपल्या सोलापूर शहर व जिल्ह्याचा विकास होईल एवढे मात्र नक्की…
आनिल भीमराव चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
मो.न.9850614082