अरे व्वा… भाऊंनी पाण्याचा प्रश्नच मिटवला… नागरिक झाले समाधानी !

प्रभाग २२ येथे पिण्याच्या पाईपलाईन कामाचे उद्घाटन…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.९ एप्रिल

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्याने व प्रभाग क्रमांक २२ मधील माजी नगरसेवक किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून सोलापूर महानगरपालिका अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या योजने अंतर्गत प्रभाग क्रमांक २२ येथील रामवाडी पोगुल मळा परिसरात १९ लाख ८ हजार २९९ रुपये खर्चित पिण्याच्या पाईपलाईनचे उद्घाटन करण्यात आले.

      रामवाडी पोगुल मळा येथे पाण्याची समस्या भेडसावत होती. बऱ्याच दिवसांपासून काही ठिकाणी आठ दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होता. सदरची पाईपलाईन जुनी झाल्यामुळे पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसून आले. ही समस्या लक्षात घेऊन येथे नवीन पाईपलाईनचे काम सुरू केले. यावेळी माजी नगरसेवक किसन जाधव म्हणाले की, नव्या पाईपलाईनमुळे पाणीपुरवठा सुरळीत होईल असे सांगितले.

     याप्रसंगी अनिश जाधव, नागेश यल्लाप्पा जाधव, राजेंद्र शिंदे, आकाश बाबू नाईक, वसीम शेख, गोपाल नाईक, तौफिक शेख, अब्बास बागवान, निहाल गायकवाड, साहिल शेख,बाळू ढाळे, रघुनाथ नाईक फिरोज पठाण अनिता पवार तनुजा गायकवाड सायरा चौधरी समीना चौधरी रिजवान बागवान, आयेशा मकानदार,सरस्वती बनसोडे,श्रीदेवी पोथीनुर शेख, स्वाती जाधव, आदींसह ईच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *