स्वच्छता मोहिमेतून स्वच्छ सोलापूर स्मार्ट सोलापूर दिसणार
२ ते १३ डिसेंबर स्वच्छता मोहिमेमध्ये एकूण 79 रस्ते होणार स्वच्छ….
प्रतिनिधी /सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. ४ डिसेंबर
स्वच्छ आणि सुंदर शहर ही सोलापूरची ओळख व्हावी यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे वतीने दि.२ डिसेंबर ते १३ डिसेंबर पर्यंत सोलापूर शहरातील मुख्य रस्त्याची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. विभागीय कार्यलय एक ते आठ मध्ये सुरू असलेल्या स्वच्छते मोहिमेस महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली- उगले यांनी भेट देऊन तिथे उपस्थित असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
या मोहिमेमध्ये आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक ते रेल्वे स्टेशन, डीआरएम ऑफिस ते डफरीन चौक, सात रस्ता ते पत्रकार भवन, विजापूर नाका ते पनाश अपार्टमेंट, बनशंकरी चौक जुळे सोलापूर ते एचएसआर पाणी टाकी, गवळी वस्ती आकाशवाणी रोड ते लोकमंगल हॉस्पिटल, दयानंद कॉलेज ते धरमकाटा चौक, धरम काटा चौक ते रूपा भवानी चौक, या विभागात आज मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम घेण्यात आली असून रस्त्यावरील धूळ काढणे, झाडांचे फांद्या छाटणी दोन्ही बाजूंवरील फुटपाथ वरील स्वच्छता करणे कचरा काढणे. या संपूर्ण मोहिमेसाठी मुख्य आरोग्य निरीक्षक आठ आरोग्य निरीक्षक ४९ स्वच्छता कर्मचारी ३८० ,जेसीबी, डंपर, कॉम्पॅक्टर, कचरा संकलन वाहने, पाण्याचे टँकर आदींसह अन्य अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित होती.
सदर मोहीम ही १३ डिसेंबर पर्यंत सुरू राहणार असून दिलेले नियंत्रण अधिकारी यांच्या अधिपत्याखाली रोज सकाळी सात ते दहा या वेळेत शहरातील मुख्य रस्त्यावरील स्वच्छता मोहीम घेण्यात येणार आहे. या यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त तैमुर मुलाणी,सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले,सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, मुख्य सफाई अधीक्षक अनिल चराटे, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोळीकर, विभागीय अधिकारी श्री महेश क्षीरसागर विभागीय अधिकारी, विभागीय अधिकारी सुनीता हिबारे,विभागीय अधिकारी हिदायत मुजावर, विभागीय अधिकारी सतीश एकबोटे पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे, सहाय्यक अभियंता विद्युत महादेव इंगळे, उपअभियंता तपंन डंके,उपअभियंता किशोर सातपुते, सहाय्यक अभियंता अविनाश वाघमारे, मुख्य आरोग्य निरीक्षक नागनाथ मेंडगुळे, उद्यान अधिकारी किरण जगदाळे, स्वप्निल सोलंकर मुख्य आरोग्य निरीक्षक आरोग्य निरीक्षक सफाई कामगार झाडूवाली बिगारी आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
मनपा आयुक्त शीतल तेली -उगले यांचे आवहान
या स्वच्छता मोहिमेमध्ये आज रखुमाई महिला बचत गटाचे अध्यक्ष सोनाली कसबे,सचिव सुनिता जाधव,अशा लक्ष्मण डोलारे,भाग्यश्री अविनाश खंदारे,मीनाक्षी किशोर जाधव यांनी सहभाग नोंदवला असून स्वच्छतेच्या मोहिमेसाठी शहरातील सामाजिक संस्था, संघटनांनाही पुढे यावे. शाळा- शाळांमधील मुलांच्या मनात स्वच्छतेचे महत्त्व रुजवावे लागेल. स्वच्छतेच्या विषयाकडे शासकीय मोहीम म्हणून न पाहता प्रत्येक व्यक्तीने स्वयंस्फूर्तीने यात सहभागी व्हावे असे आव्हान महापालिकेचे आयुक्त शीतल तेली – उगले यांनी केले. स्वछता मोहीम ही केवळ या कालावधीसाठी जरी असली तरी यामध्ये सातत्य ठेवण्यात यावे असेही आयुक्त महोदयांनी सर्व विभागाला सुचना दिल्या