शहर मध्य चे घमासान मिटले का ? विधानसभेचा तिढा सुटला का ? शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष 

देवेंद्र कोठे समर्थकांचा एकच जल्लोष  ; देवेंद्र दादांना करणार आमदार…

शहर मध्य चे घमासान मिटले का ? विधानसभेचा तिढा सुटला का ? शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष …

देवेंद्र कोठे समर्थकांचा जल्लोष

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२६ ऑक्टोंबर – अखेर शहर मध्यचे कोडे उलगडले, गुलदस्तातील पत्ता झाला ओपन, सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांना अखेर शहर मध्य मधून भाजप पक्षातर्फे उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात या जागेवरून मोठीच खडाजंगी पहावयास मिळाली. गेल्या एक महिन्याभरात होती, नव्हती तेवढी भडास सेनेच्या राजकीय नेत्यांनी काढली. दरम्यानच्या काळात देवेंद्र कोठे यांनी मौन बाळगले होते. पक्षांतर्गत तसेच इतर पक्षांमध्ये देखील त्यांच्या विरोधात उघडपणे आघाडी घेतली होती. मात्र या सर्वांवर देवेंद्र कोठे यांनी मात करत काटेरी झुडपातून वाट काढली आहे. अखेर शेवटी आज त्यांचे भाजपच्या यादीमध्ये नाव जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले होते. कोठे यांच्या निवासस्थानी तसेच कार्यालयासमोर फटाके उडवून आणि गुलाल उधळून एकच जल्लोष साजरा करण्यात आला.

    दरम्यान भाजपकडून उमेदवारी झाल्यानंतर पहिल्यांदाच     त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद देवेंद्र फडणवीस यांच्या रूपातून लाभला आहे. या पुढील काळात आणखीन विकासकामे करू असे शांतप्रिय मृदुभाषी देवेंद्र कोठे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत विरोधकांना ही आपलेसे केले. तत्पूर्वी त्यांच्या समर्थकांनी मेकॅनिकी चौकातील कार्यालयासमोर एकच जल्लोष केला. गुलालाची मुक्त उधळण करत फटाके उडवून जल्लोष साजरा केला. यावेळी देवेंद्र कोठे यांना भेटण्यासाठी असंख्य कार्यकर्ते आणि भाजप पक्षातील पदाधिकारी आले होते.

देवेंद्र फडणवीस माझ्यासाठी स्वामी समर्थच 

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझ्यासाठी स्वामी समर्थच असून त्यांनी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचा प्रयत्न केला आणि शेवटपर्यंत उभे राहिले. प्रदेश अध्यक्ष, वरिष्ठ नेते स्थानिक पदाधिकारी आणि माझे कार्यकर्ते यांचे आभार मानतो. यापुढील काळातही ते माझ्यासोबत राहतील. सदरची निवडणूक लढवून जिंकू.

देवेंद्र कोठे, उमेदवार भाजप.

शहर मध्य चे घमासान मिटले ? विधानसभेचा तिढा सुटला ? शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष..

जरी भाजप पक्षाला शहर मध्य ची जागा देण्यात आली असली तरीही, शिवसेनेने शहरातील तीन तसेच जिल्ह्यातील दोन असे एकूण पाच विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे शहर मध्यचे घमासान मिटले का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारी नंतर आता शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम राहणार का? का साहेबांचा आदेश म्हणून एक्झिट घेणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

देवेंद्र कोठे साधणार का सुवर्ण मध्य

पक्षांतर्गत तसेच पक्षाबाहेर होत असलेला विरोध, बंडाचे निशान, तसेच शिवसेनेची डोकेदुखी या सर्व आघाड्यांवर देवेंद्र कोठे यांना तोंड द्यायचे आहे, पक्षातील तसेच पक्षाबाहेरील विरोध मिटवून सर्वांना आपलेसे करणे, कोठे यांना करावे लागणार आहे. होणारे मत विभाजन यामुळे रोखले जाणार आहे. असे कडवे आव्हान कोठे यांच्यासमोर उभे टाकले आहे. अशावेळी देवेंद्र कोठे निर्माण झालेली परिस्थिती कशा पद्धतीने हाताळतात, हे पाहणे देखील औत्सुक्याचे व महत्त्वाचे ठरणार आहे. किंबहुना याच गुणावरच त्यांची आगामी निवडणूकीची सत्वपरीक्षा असणार आहे. नगरसेवक पदाचा अनुभव गाठीशी घेऊन कोठे कुठवर मजल मारतात.हे येणारा काळच ठरवणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *