सोलापूर शहर मध्य मधून सर्वसामान्य गरीब कुटुंबातील उच्चशिक्षित तेलगू भाषिक डॉक्टर ज्योती वाघमारे यांना जनतेची पसंती….!
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. ७ ऑक्टोंबर – मोदी येथील जगजीवन वस्ती येथे बालपण व शिक्षण अत्यंत खडतर परिस्थितीतून काढून कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले. ज्या वालचंद कॉलेजमध्ये शिक्षण घेतले त्याच कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून काम सुद्धा केले याबरोबरच वालचंद इन्स्टिट्यूट मध्ये सुद्धा प्राध्यापक म्हणून काम केले. हे सर्व करत असताना सुरुवातीस सूत्रसंचालन करून शिक्षण पूर्ण केले तसेच बारावी परीक्षेच्या बोर्डात मागासवर्गीयातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांवर व्याख्याने सुद्धा दिले स्वतःच्या शिक्षणाबरोबरच पीएचडी सुद्धा पूर्ण केले. सध्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे या शिवसेना शिंदे गटाच्या राज्य प्रवक्त्या म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी या पदावर एक वर्षांमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी १९ कोटीचा निधी आणला. सध्या विधानसभेच्या निवडणुकीत शहर मध्य मधून त्यांना स्वतःच्या समाजाचा व इतर समाजाचा पाठिंबा मिळत आहे. डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी १९ कोटीचा निधी खेचून आणताना झोपडपट्टी भागातील रस्ते गटाने अशी कामे प्राधान्याने हाती घेतले.दरम्यान मोची समाजा साठी बाबू जगजीवन राम आर्थिक विकास महामंडळ लोधी समाजासाठी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि पद्मशाली समाजासाठी मार्कंडेय आर्थिक विकास महामंडळ व्हावेत अशी आग्रही मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या कडे करून त्याचा सतत पाठपुरावा करत आहे मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाची समन्वयक या नात्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लेक लाडकी योजना अन्नपूर्णा योजना या विविध योजनांचा प्रचार प्रसार त्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रभावीपणांना करत आहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे राजाचा बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो मेहनत करेगा या उक्तीची संपूर्ण प्रचिती डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या व्यक्तिमत्वातून येते.
शहर मध्य चा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे स्वतः गरिबीचे चटके खाल्ल्यामुळे त्यांना गरिबांच्या व्यथा वेदना खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे निवडणुकीला सामोरे जाण्याच्या आधीच तब्बल १९ कोटीचा विकास निधी खेचून आणून विविध भागात भूमिपूजन करून त्यांनी कामाला सुरुवात केली आहे त्यामुळे विविध समाज घटकांमधून त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे.