कामगारांसाठी आमदार बनायचे आहे – आडम मास्तर  ! मतदारांना घातली भावनिक साद…..

कामगारांसाठी आमदार बनायचे आहे – आडम मास्तर 

दत्तनगर येथून काढण्यात आली जंगी पदयात्रा …!

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१३ नोव्हेंबर –

विधानसभा निवडणूक आता शिगेला पोहोचली आहे. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसा प्रचाराची धामधूम वाढत आहे. शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस, माकप, आणि एम आय एम यांच्या चौरंगी लढत असून, माजी आमदार नरसैया आडम मास्तर यांनी निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांवर जोरदार हल्ला करत पदयात्रेतून मतदारांशी संवाद साधला आहे.

दरम्यान मास्तर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कामगारांसाठी ही निवडणूक लढवायची आहे आणि कामगारांसाठीच आमदार बनायचे आहे, असे सांगत माझ्या आमदारकीची सुरुवात दत्तनगर येथूनच झाली आणि शेवट देखील इथेच होणार आहे. अशी भावनिक साद घातली. तत्पूर्वी बुधवारी सकाळी ११ वाजता दत्तनगर येथील माकप कार्यालयातून पदयात्रा सुरू झाली. या पदयात्रेत माकपचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. पूर्वभागातून सदरची पदयात्रा काढण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *