तौफिक शेख यांनी गाजवली फॉरेस्टची सभा  ; शेख यांना संघटनाचा वाढता पाठिंबा

तौफिक शेख यांना सामाजिक संघटनांचा पाठिंबा  ; तर तौफिक शेख यांनी गाजवली फॉरेस्टची सभा

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१६ नोव्हेंबर –

विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार तौफिक शेख यांच्या प्राचारार्थ तेलंगी पाच्छापेठ येथे कॉर्नर मीटिंगचे आयोजन याराना टी एस सरकार मित्र परिवाराच्या वतीने घेण्यात आले. यावेळी विविध घोषणाबाजी करत पुष्पहार अर्पण करून तौफिक शेख यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

     दरम्यान तौफिक शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, शहर मध्य च्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे” मी विकासाच्या मुद्दा घेऊन तुमच्यासमोर आलेला आहे” जातिवादी पक्षांना थारा देऊ नका. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी ख्वाजा शेख, आसिफ सय्यद, सादिक सोफी, अरबाज शेख, हूजेब बागवान, मोहम्मद जमखंडी, वसीम, मोईन, इमरान, मशाक, अफान, समर्थ, ईश्वर, आदींसह तेलंगी पाच्छापेठ येथील नागरिकांची उपस्थिती होती.

तोफिक शेख यांनी गाजवली फॉरेस्टची सभा 

सोलापूर शहर मध्य विधानसभेचे अपक्ष उमेदवार तोफिक शेख यांच्या फॉरेस्ट परिसरातील चांदणी चौक येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तोपिक शेख यांचा भव्यदिव्य नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी सभेला संबोधित करताना तौफिक शेख म्हणाले की, आपण सर्वांनी निवडणुकीच्या अगोदरच इतके मोठे स्वागत करून मला भरभरून प्रेम दिले, मला वाटते असेच साथ नेहमीच माझ्यासोबत असावे अशी प्रार्थना करतो. असे सांगितले. पुढे ते म्हणाले, जातीवादी पक्षांना थारा न देता आपण भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे राहावे, असे यावेळी तोफिक शेख म्हणाले. दरम्यान यावेळी फॉरेस्ट परिसरातील नागरिक, मज्जितचे ट्रस्टी, बुद्ध विहारचे विश्वस्त मंडळी आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *