तौफिक शेख यांच्या कॉर्नर सभेला नागरिकांचा प्रतिसाद ; बक्कर कसाब जमातने तौफिक शेख यांना दिला पाठिंबा
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१५ नोव्हेंबर –
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार करत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी लढवत तौफिक शेख यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. तौफिक शेख यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे सध्या शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
तौफिक शेख यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक भाग पिंजून काढत, प्रचार जोमात सुरू केला आहे. त्याच अनुषंगाने गुरुवार( दि.१४) नोव्हेंबर रोजी रात्री मोदी व तसेच शामा नगर परिसरात कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी तौफिक पैलवान तुम्ही निश्चित रहा” आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहणार आहोत. अशी भावनिक साद घातली. यावेळी बक्कर कसाब जमातीचे चांद साब, बाबू भाई, इब्राहिम भाई, नारायणराव, मोहन ऐडेलु, नबीलाल नदाफ, मोहसीन शेख, बाबू कमलापुरे यांसह मोदी परिसरात तसेच शामानगर परिसरातील रहिवाशांची उपस्थिती होती.