तोफिक शेख यांना भिमसैनिकांचा वाढता पाठिंबा ; तक्षशील नगर येथे झाली कॉर्नर सभा.…
जय भीम जय मीमच्या घोषणा देत केली वातावरण निर्मिती…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१५ नोव्हेंबर –
विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. प्रचाराचा कालावधी अंतिम टप्प्यात आल्यानंतर प्रत्येक उमेदवार प्रचारात व्यस्त झालेले दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी लढवत असलेले तोफिक शेख यांचे ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहे.
दरम्यान त्याच अनुषंगाने गुरुवारी तोफिक शेख यांची कुमठा नाका येथे तक्षशील नगर येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेपूर्वी तोफिक शेख यांचे मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले. शहर मध्य मधून अपक्ष उमेदवार शेख हे मनमिळाऊ व्यक्तिमत्व आहेत ते कधीच जातीपातीचे राजकारण केलेले नाही.
तोफिक शेख यांच्याकडे घेऊन गेल्यास नक्कीच ते काम करतात” कधीच ते जात बघून काम केलेले नाही’ इतकेच नव्हे तर मी बौद्ध समाजाचा आहे माझी पत्नी नूतन गायकवाड यांना तिकीट देऊन त्यांना सोलापूर महानगरपालिकेत निवडून आणले. त्यांच्या आशीर्वादामुळे आज माझी पत्नी नूतन गायकवाड ह्या नगरसेविका झाल्या. इतकेच नव्हे तर विजापूर रोड येथे राहणारे अजित बनसोडे यांची पत्नी पूनम बनसोडे यांना देखील त्यांनी तिकीट दिले व त्यांना देखील निवडून आणले. याचा सर्व श्रेय हे तोफिक शेख यांनाच जाते. आमचं काम पाहून आम्हाला बळ दिले व आम्हाला निवडून आणले अशा व्यक्तिमत्त्वाला आपणच सोलापूर शहर मध्य चा आमदार करूया असे आवाहन यावेळी बोलताना प्रमोद गायकवाड यांनी केले.
यावेळी अजित बनसोडे, माजी नगरसेविका वाहेदा शेख, अमितकुमार अजनाळकर सर, माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड, पिंटू गाडे, चंद्रकांत गायकवाड, दत्ता साळवे, फिरोज शेख, श्रीमंत ओव्हाळ, उमेश जेटीथोर, कोमल मासले, श्रीकांत नारायणकर, लकी गायकवाड, अदनान शेख, अयान सरकार, जैद शेख यांसह आदींची उपस्थिती होती.