देवेंद्र कोठे यांच्या टेन्शनमध्ये वाढ ; मध्य मध्ये बंडखोरीचे फडकावणार निशान ?
तेलुगू भाषिकांचा श्रीनिवास सांगा यांना मिळतोय पाठिंबा!
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर,दि.२७ ऑक्टोंबर – सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघावरून सुरू झालेले घामासान अध्याप पर्यंत थांबण्याचे नाव घेत नाहीये. भाजप पक्षांतर्गत तसेच इतर पक्षात देखील देवेंद्र कोठे यांना विरोध कायम आहे. अशातच भाजपच्या निष्ठावंतांनी पक्षश्रेष्ठींकडे आमच्यापैकी कोणालाही तिकीट द्या, अशी मागणी केली होती. मात्र त्या विरोधाला डावलून देवेंद्र फडणवीस यांनी काल देवेंद्र कोठे यांची उमेदवारी जाहीर त्यामुळे भाजप पक्षामध्ये असणाऱ्या निष्ठावंतांना जबर धक्का बसला आहे. अशातच आता अनेकांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. त्यामध्ये श्री प्रतिष्ठानचे श्रीनिवास संगा यांचे नाव आघाडीवर आहे.
श्रीनिवास सांगा यांनी लोकसभेपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करत विविध विकास कामे आणि अनेक गोरगरिब अनाथांना मदतीचा हात दिला.
आपल्या श्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक गरजूंना रोजगार तसेच तेलगू भाषिक महिलांना शिबिरे घेऊन विविध उपक्रमांतर्गत रोजगार तसेच कागदपत्राची पूर्तता करून दिली. आर्थिक तसेच मानसिक आधार देऊ नये अनेकांना आपलेसे केले. याच सामाजिक कार्याच्या शिदोरीवर श्रीनिवास संगा यांनी भाजप पक्षाकडे तिकिटासाठी मागणी केली. परंतु कोठे यांनी अचानक भाजपमध्ये एन्ट्री मारत देवेंद्र फडणवीस यांचे पालकत्व स्वीकारले. आणि पक्षांतर्गत बंडाला सुरुवात झाली. आता भाजपमधील अनेक इच्छुकांनी बंड पुकारले आहेत. त्यामुळे येणारा काळ कोठे यांना अवघड जाणार आहे. बंडोबांचे बंड थंड करणार का याकडे राजकीय वर्तुळात सर्वांचे लक्ष लागले आहे.
संगा यांचा लढवण्याचा केला निर्धार….
श्रीनिवास संगा यांनी बंडाचे निशाण हाती घेत, शहर मध्य मधून निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांना सोलापूर शहरातील सुमारे अठरावून अधिक तेलगू समाज भाषिकांनी पाठिंबा दिला आहे सामाजिक काम आणि तेलुगु भाषिकांचा पाठिंबा यामुळे शहर मध्य मधील तेलगू भाषिक पद्मशाली आणि इतर समाजाचे मतं खेचण्याचा संगा यांचा प्रयत्न असणार आहे. असे असले तरीही अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.