विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले ; निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी महेश कोठे तुतारीच्या गजरात निघाले…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन
सोलापूर, दि. २८ ऑक्टोंबर – शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उत्तर मधील उमेदवार महेश कोठे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत रॅली काढली. यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आदींसह महाविकास आघाडीतील नेत्यांची उपस्थिती होती.

दरम्यान मोठ्या उत्साहात आणि वाजत गाजत महेश कोठे यांच्या रॅलीस बलिदान चौक येथून सुरुवात झाली. तुतारीच्या आवाजात निघालेली ही रॅली पुढे कुंभार वेस, बसवेश्वर महाराज पुतळा कौतम चौक मार्गे मधला मारुती टिळक चौक-कसबा गणपती-तरटी नाका पोलीस चौकी छत्रपती शिवाजी महाराज चौक-मेकॅनिकी चौक सरस्वती चौक-चार हुतात्मा चौक या ठिकाणी समारोप झाला. तिथून पुढे महेश कोठे हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले.
त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, काँग्रेसच्या शहराध्यक्ष चेतन नरोटे, भारत जाधव, सुनिता रोटे, अक्षय वाकसे, सरफराज शेख, यांच्यासह हजारों समर्थक कार्यकर्ते सहभागी झाले होते