भाजपाच्या सर्व्हे मध्ये सुद्धा महेश अण्णांच आमदार !
मालकांचे वीस वर्षे संपले आता महेश अण्णांच आमदार होणार – रोहित पवार…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. ८ नोव्हेंबर – सोलापूर शहर उत्तर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांच्या प्रचारार्थ पत्रा तालीम परिसरात आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी जाहीर सभा पार संपन्न झाली. यावेळी आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या उमेदवाराचे नाव न घेता मालकांना चांगलेच फैलावर घेतले.
दरम्यान भाजपचे आमदार स्वतःहून लोकांना सांगतात मला मालक म्हणा, ज्या मालकांना स्वतःच्या मुलाची चिंता आहे. त्यांना आता घरी बसवलं पाहिजे, आणि आता खऱ्या अर्थाने महेश कोठे यांच्यासारख्या सेवकाला आमदार बनवण्याची वेळ आली आहे. आता मालकांचे वीस वर्षे संपले असून भाजपच्या सर्व्हेक्षणमध्ये सुद्धा महेश कोठे आमदार आहेत. असे म्हणत उत्तर मालकांना चांगलेच फैलावर घेतले.
यावेळी शहर उत्तर विधानसभेचे आमदार महेश कोठे, सुधीर खरटमल, महेश गादेकर, नाना काळे, भारत जाधव, मनोहर सपाटे, जनार्दन कारमपुरी, चेतन नरोटे, विनोद भोसले, प्रथमेश कोठे, प्रशांत बाबर, अक्षय वाकसे, शेरू कुरेशी, सरफराज शेख, सुनीता रोटे, रेखा सपाटे, प्रतीक्षा चव्हाण, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.