उत्तर मध्ये महेश कोठे यांचा विजयाचा निर्धार ;
पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.९ नोव्हेंबर – सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महेश विष्णुपंत कोठे यांच्या प्रचारार्थ शनिवारी प्रभाग क्रमांक सहा मध्ये पदयात्रा काढण्यात आली. सदरची पदयात्रा भय्या चौक दमानी नगर पावन गणपती हब्बू वस्ती बल्लारी चाळ गंगा नगर अमराई देशमुख वस्ती आदेश मार्गावरून ही पदयात्रा शेटे वस्ती येथे समारोप करण्यात आली.

यापुढील यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयकुमार देशमुख यांच्या सोबत शिवसेना होती म्हणून ते निवडून येत होते, पण यंदाच्या विधानसभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि आमच्या सोबत असल्यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचा निर्धार महेश कोठे यांनी व्यक्त केला.

उत्तर विधानसभा मध्ये शिवसेनेची किती ताकद आहे हे यंदाच्या निवडणुकीत देशमुख कळून चुकेल, अस म्हणत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गणेश वानकर यांनी महेश कोठेच निवडून येणार असल्याचा दावा व्यक्त केला.
