आमदार झाल्यास शहराचा करणार सर्वांगीण विकास – फारूक शाब्दी !
मुस्लिम, दलित, मोची, पद्मशाली समाजबांधवांची घेतली भेट….
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.११ नोव्हेंबर – सोलापूर शहर मध्यचे उमेदवार फारूक शाब्दी यांनी शनिवार पेठ, मरहूम पट्टी येथे कॉर्नर बैठक घेतली. या कॉर्नर बैठकित शनिवार पेठ, मरहूम पट्टी येथील मुस्लिम, दलित, मोची, पद्मशाली,असे सर्व समाजातील मतदार सहभागी झाले होते.
यावेळी फारुख शाब्दी यांनी महत्वपूर्ण घोषणा केल्या. मी माझ्या माता भगिनींसाठी चार वेगवेगळ्या योजना आणणार आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार फारूक शाब्दी यांनी शनिवार पेठ, मरहूम पट्टी मधील सर्व मतदारांना विश्वासपूर्ण आश्वासन दिले.
आमदार झाल्यावर शनिवार पेठ, मरहूम पट्टी भागातील सर्वांगीण विकास करणार अशी ग्वाही दिली. या बैठकीत एम. आय.एम पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.