ये सेब है तो सब सेफ है  ! तौफिक शेख म्हणजे कामाचा माणूस ; वकील बांधवांनी केला तौफिक शेख यांचा सत्कार ….

ये सेब है तो सब सेफ है 

तौफिक शेख म्हणजे कामाचा माणूस ; वकील बांधवांनी केला तौफिक शेख यांचा सत्कार ….

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१३ नोव्हेंबर – 

विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेले आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस,  एमआयएम, माकप आणि अपक्ष उमेदवार तौफिक शेख यांच्यात मुख्य लढत रंगलेली आहे.

दरम्यान सोलापूर शहर मध्य विधानसभेचे अपक्ष उमेदवार तौफिक शेख यांची चर्चा शहर मध्य मतदारसंघात जोरदार रंगत आहे. तौफिक शेख यांच्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी सभा, कॉर्नर बैठका,यांसह निवडणुकीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

त्यांच्या कार्यालय परिसरात सोलापूर शहरातील वकील मंडळींनी तौफिक शेख यांचा सत्कार केला. यावेळी शेख यांना पुष्पहार अर्पण करत धर्मांत व जातीवादी पक्षाला थारा न देता तौफिक शेख सारख्या सच्चा माणसाच्या पाठीमागे आपण सर्वजण उभे राहू असे वकील मंडळी बोलताना म्हणाले यावेळी  ॲड. असीम बांगि यांच्या कार्यालयासमोर सत्कार करत शेख यांना पाठबळ देण्यात आले सदर कार्यक्रमास

ॲड. सुरेश बापू गायकवाड (माजी अध्यक्ष बार असोसिएशन, सोलापूर) ॲड. असीम बांगी  (माजी उपाध्यक्ष बार असोसिएशन, सोलापूर) ॲड. करण भोसले (माजी सचिव बार असोसिएशन, सोलापूर) ॲड. खतीब वकील, ज्येष्ठ वकील, ॲड. एम.ए.इनामदार, ज्येष्ठ वकील, ॲड बडेखान  ज्येष्ठ वकील, ॲड रईसा मदनी, ज्येष्ठ वकील, ॲड.  जाहिद दर्जी, ॲड. अब्दुल शेख , ॲड. परवेझ मुलाणी, ॲड. धनंजय येमुल, ॲड फिरोज शेख, ॲड इक्बाल शेख, ॲड. ऋषिकेश मट्रे, ॲड.  आसिफ पटेल, ॲड. वसीम डोंगरी, ॲड. आकाश माने, ॲड. अब्दुल्ला खतीब, ॲड. सैफ शेख, ॲड.  इरांना बिराजदार, ॲड. दनिया शेख यांसह आदींची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *