नागरिकांच्या साथीने विजयाच्या दिशेने आगेकूच – चेतन नरोटे
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१३ नोव्हेंबर –
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चेतन पंडित नरोटे यांच्या प्रचारार्थ तेलंगणाचे माजी खासदार पी. हणमंतराव खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संयोजक माजी नगरसेवक विनोद भोसले, प्रदेश सरचिटणीस संजय हेमगड्डी, रियाज हुंडेकरी, आरिफ शेख, जॉन फुलारे, माजी नगरसेविका श्रीदेवी फूलारे, बसवराज म्हेत्रे गणेश डोंगरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्र.१५ मध्ये वारद चाळ हनुमान मंदिर येथील पदयात्रेला सुरुवात करण्यात येऊन जुनी मिल चाळ, पाटील चाळ, जैनुद्दीन चाळ, एन.जी. मिल चाळ, रामलाल चौक, महापौर बंगला, जैन मेडिकल, स्वामी समर्थ मंदिर, पटवर्धन चौक, मार्केट चौक, चांदणी चौक मच्छी मार्केट कुमार चौक, काडादी चौक, गांधी पुतळा, भव्य पदयात्रा उत्साहात पार पडली.
या पदयात्रेत हजारों नागरिक बंधू भगिनींनी पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र येत सहभाग घेतला. यावेळी चेतन नरोटे म्हणाले की, प्रभाग १५ मधील जनतेने दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे माझे मनोबल उंचावले आहे. जनतेने विजयाचा विश्वास दिला आहे.