अखेर फुलारे अन् शिंदे कुटुंबीयांची दिलजमाई ; गोल्डन नगरसेविका झाल्या पुन्हा काँग्रेसमय
चेतन नरोटे यांच्या प्रचारासाठी पूर्ण ताकदीने उतरणार ; फुलारे दांपत्याची ग्वाही !
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.११ नोव्हेंबर – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय कलाटणी मिळाली आहे. काँग्रेसवर नाराज होऊन काही मोची समाजाचे नेते उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप पक्ष प्रवेश केल्यानंतर, काँग्रेस पासून दुरावलेल्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे, आणि जॉन फुलारे यांना आपल्याकडे वळवण्यात काँग्रेसला यश आले आहे. काँग्रेसचे शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चेतन नरोटे यांनी देशाचे नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या जनवातल्या या निवासस्थानी बैठक घेऊन हा मनमुटाव केला आहे. त्यामुळे शहराच्या राजकारणात एक वेगळी कलाटणी मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान सोमवार (दि.११) नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता जनवात्सल्य या निवासस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे, मोची समाजाचे नेते जॉन फुलारे, उमेदवार चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी महापौर संजय हेमगड्डी यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीत बराच वेळ चर्चा होऊन अखेर फुलारे दांपत्याची नाराजी दूर झाली. यावेळी काँग्रेस कार्यकर्तेही आनंदी झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे आणि शहर मध्यचे काँग्रेस उमेदवार चेतन नरोटे यांना निवडून आणण्याच्या निर्धार केला.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना फुलारे म्हणाले, आम्ही काही कारणास्तव नाराज होतो. परंतु आम्ही पक्ष सोडला नाही. आज ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी चेतन नरोटे आणि आमच्यातील नाराजी समोर बसून दूर केली आता इथून उमेदवार चेतन नरोटे यांचा प्रचारात पूर्ण ताकतीने सक्रिय होणार असल्याचे सांगितले.
२०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीनंतर काही अशा घटना घडल्या की श्रीदेवी जॉन फुलारे आणि चेतन नरोटे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला. तेव्हा फुलारे यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता आमची नाराजी दूर झाली आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा काँग्रेसवासी झालो आहोत.