सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात लोधी मोची समाजाने प्रभाग १७,१३,१४ केला भगवामय…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२३ नोव्हेंबर –
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात अखेर कमळ फुलले आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध असलेला शहर मध्य विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यात भाजपला मोठे यश आले आहे. या विजयामुळे शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात भाजपचे दणदणीत वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.

दरम्यान शहर मध्ये विधानसभा मतदारसंघातून भाजपचे देवेंद्र कोठे यांचा तब्बल ४८ हजाराहून अधिक मताधिक्यांनी विजय झाला आहे. त्यांना सुमारे १,०९,१९५ इतकी मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी एमआयएमचे उमेदवार फारुक शाब्दी यांना ६०,७९० इतके मते प्राप्त झाली. काँग्रेसचे तिथं नरोटे यांना १६,०९२ तर माकपचे आडम मास्तर यांना ६,७४९ मते मिळाली. या विजयात शहरातील लोधी मोची समाजाचे मुख्य योगदान मिळाले आहे. मोची आणि लोधी समाजाचे सुमारे ५० हजाराहून अधिकचे मतदान देवेंद्र कोठे यांच्या पारड्यात पडले आहे. त्यामुळे त्यांचा विजय सुपर झाला आहे.

शहरातील लष्करसह इतर परिसर येथील प्रभाग क्रमांक १३,१४.आणि १७ संपूर्ण झाला भगवामय.
सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक १३,१४.आणि १७ संपूर्ण भगवामय झाला. यामुळे देवेंद्र कुठे यांचा विजय अधिक सुकर ठरला आहे. येथे भाजपचे माजी नगरसेवक रवी काय्यावाले यांचा प्रभाग असून येथे एकतर्फी मतदान झाल्याचे दिसून येत आहे. देवेंद्र कोठे यांच्या विजयानंतर येथे मोठा जल्लोष करण्यात आला. गुलाल उधळून फटाके फोडून जय श्रीराम जय घोषणा देण्यात आल्या. सर्व परिसर भाजपमय आणि भगवामय झाल्याचे दिसून आले. शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपने पहिल्यांदाच कमळ फुलवल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर दिसून आली