देव, देश, धर्माच्या रक्षणासाठी देवेंद्र कोठे यांच्या सोबत  :-अंबादास गोरंटला

देव, देश, धर्माच्या रक्षणासाठी देवेंद्र कोठे यांच्या सोबत 

अंबादास गोरंटला यांचे हिंदू समाजाला आवाहन !

तभा वृत्तसेवा,

सोलापूर, दि.१४ नोव्हेंबर –

देव, देश, धर्माच्या रक्षणासाठी पद्मशाली समाजासह संपूर्ण हिंदू समाजाने भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए) महायुतीचे शहर मध्य विधानसभेचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या सोबत कायम राहणार असून संपूर्ण ताकदीने उभे रहावे, असे आवाहन हिंदुत्ववादी नेते अंबादास गोरंटला यांनी केले.

शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी अंबादास गोरंटला यांच्या निवासस्थानी भेट देऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव संदीप जाधव उपस्थित होते.

अंबादास गोरंटला म्हणाले, आगामी काळात हिंदुत्वाच्या रक्षणासाठी संपूर्ण सहकार्य आणि काम करण्याची ग्वाही देवेंद्र कोठे यांनी दिली आहे. त्यामुळे धर्माच्या रक्षणासाठी आणि शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी देवेंद्र कोठे यांना विजयी करणे आवश्यक आहे. त्यामुळे देवेंद्र कोठे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी माझे १०० टक्के योगदान राहील. पूर्ण ताकतीने आपण देवेंद्र कोठे यांच्या पाठीशी राहणार आहोत. सोलापूर शहर मध्य मतदार संघातील पद्मशाली समाजासह सर्व हिंदू बांधवांनी देवेंद्र कोठे यांना निवडून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करावेत, असे आवाहनही अंबादास गोरंटला यांनी याप्रसंगी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *