अखेर शहर मध्य सुटले भाजपला ; देवेंद्र कोठे यांचे नाव फायनल !
सोलापूर व्हिजन न्यूजचा अंदाज ठरला खरा…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, २६ ऑक्टोंबर – विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली असून सर्वांचे लक्ष लागलेल्या सोलापूर शहर मध्य यामतदारसंघातून भाजपने अपेक्षे प्रमाणे युवा नेते देवेंद्र कोठे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यानिमित्ताने सोलापूर व्हिजन न्युजने देवेंद्र कोठे यांना उमेदवारी मिळण्याचा सर्वप्रथम केलेला दावा खरा ठरला आहे.
यापूर्वीच सोलापूर व्हिजनने देवेंद्र कोठे यांना शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याला वरिष्ठ नेते मंडळीने देखील दुजोरा दिला होता. मात्र त्यावर अंतिम शिक्कामोतर्ब झाला नव्हता. तो आज पूर्ण झाला आहे. त्यामुळे सोलापूर व्हिजनने मांडलेला अंदाज खरा ठरल्याचे राजकीय वर्तुळात ऐकण्यास मिळत आहे.
देवेंद्र फडणवीस सोबत देवेंद्र कोठे दोन देवेंद्र आले एकत्र …
दरम्यान देवेंद्र कोठे यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देवेंद्र कोठे यांचे पालकत्व स्वीकारले होते. तसेच कोठे यांनी देखील फडणवीसांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली, काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना मोठ्या मताधिक्यापासून रोखले. मागील पाच महिन्यात त्यांनी महासेवा शिबिराच्या माध्यमातून मोर्चे बांधणी करत आपली ओळख निर्माण केली आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी भाषण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. शहर उत्तर मध्ये महेश कोठे यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे देवेंद्र कोठे यांना उमेदवारी मिळाल्याने एकाच जिल्ह्यात काका पुतण्याला उमेदवारी मिळाली आहे. आता या मतदारसंघातून काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे