मुस्लिम समाज बांधवांच्या मेळाव्यानंतर शहर मध्य वर आज होणार फैसला ! काँग्रेसच्या भूमिकेकडे लागले सर्वांचे लक्ष !

मुस्लिम समाज बांधवांच्या इशारानंतर काँग्रेसच्या भूमिकेकडे लागले सर्वांचे लक्ष !

“मुस्लिम समाज बांधवांच्या मेळाव्यानंतर शहर मध्य वर आज होणार फायनल नाव जाहीर “

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि. २० ऑक्टोंबर – महाराष्ट्रचे विधानसभेचे बिगुल वाजले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष आपापल्या निवडणुकीच्या तयारीत गुंतलेले दिसत आहेत. सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्ष आपाप आपल्या स्टॅंडिंग आमदारांची तसेच इच्छुक उमेदवारांची चाचणी करत आहेत.

     दरम्यान सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी सत्ताधारी तीनही पक्षातील नेत्यांमध्ये  पहावयास मिळत आहेत. येथे काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी हॅट्रिक साधली. त्यानंतर त्यांची खासदारपदी जनतेच्या माध्यमातून वर्णी लागल्याने या जागेवर महाविकास आघाडीसह महायुतीच्या अनेक नेत्यांनी दावा ठोकला आहे. पूर्वाश्रमीपासून काँग्रेसचा मतदार संघ म्हणून ओळख असणाऱ्या शहर मध्य वर आपली पकड मजबूत राहावी यासाठी शिंदे सेनेचे शिवसैनिक देखील गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असताना दिसत आहेत. त्याच पद्धतीने भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी देखील या जागेसाठी आपल्या गॉडफादरकडे फिल्डिंग लावली आहे. त्याच पद्धतीने महाविकास आघाडीत देखील या जागेवरून मोठे घामासान दिसत आहे. काँग्रेसची जागा स्वतः काँग्रेस लढवणार का ? आपल्या घटक पक्षाला जागा देणार हे देखील अजूनही गुलदस्त्यात आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचे कार्यकर्ते देखील यासाठी आक्रमक दिसत आहेत.

शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी मुस्लिम समाजाचा उमेदवार द्यावा अशी मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये चलबीचल सुरू झाली आहे. खासदार प्रणिती शिंदे यांनी ही जागा मुस्लिम समाजाला द्यावी. यासाठी कोणतेही नाव निश्चित करावे. अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्यामुळे काँग्रेसला घरचा आहेर मिळाला आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकी दरम्यान काँग्रेसने माजी आमदार नरसय्या आडम यांना शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या कोट्यातून उमेदवारी देऊ असे आश्वासन दिल्याने, काँग्रेस घोडखिंडीत सापडली आहे. आजच यावर मुस्लिम समाज बांधवांनी मुस्लिम बांधवांचा मेळावा घेऊन अंतिम निर्णय घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आपल्याच पक्षातील मुस्लिम बांधवांनी बंडखोरी करण्याचा इशारा दिल्यानंतर काँग्रेस काय भूमिका घेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *