सोलापूर शहर मध्य मध्ये फरुक शाब्दीचा वाढतोय जोर ;
उत्साह पूर्ण वातावरणात मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.८ नोव्हेंबर – सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात एम.आय.एम चे उमेदवार फारूक शाब्दी यांनी पुढाकार घेतला असून डोअर टू डोअर भेटीगाठी करत मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांचे सर्वत्र स्वागत करण्यात झाले.
शहर मध्य विधानसभा मतदारसंघातीलयतीम खाना परिसर, थोबाडे वस्ती परिसर, रामवाडी परिसर, लिंबेवाडी परिसर, भैरुवस्ती, इरण्णा वस्ती, गरीबी हटाव झोपडपट्टी, रेवणसिद्वेश्वर मंदिर, जुना विजापूर नाका आणि अबू हनीफा मस्जिद या ठिकाणी कॉर्नर बैठका घेतल्या.
घरोघरी भेटीगाठी करत प्रचारातून मतदारांशी संवाद साधला. एमआयएम चे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्व समाजातील मतदारांनी फारूक शाब्दी सोबत सहभाग घेतला होता. फारूक शाब्दी यांनी मतदारांशी संवाद साधल्यामुळे एमआयएमची एक वेगळी सर्वधर्म समभाव असल्याची छाप पडली आहे. सततच्या संवादामुळे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात शाब्दीमय वातावरण झालेले दिसत आहे.