रे नगर च्या सभासदांचे कर्ज माफ करा – आडम मास्तर
भांडवलधारांचे कर्ज माफ करता ; तर कामगारांचे का नाही ?आडम मास्तर यांची भर सभेत टीका
आमदार केल्यास वर्षात जुनी मिल चाळ नव्याने बांधणार
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दी. १० नोव्हेंबर – विधानसभा निवडणूक शहर मध्य मधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार आडम मास्तर यांच्या प्रचारार्थ जुनी मिल चाळ येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी माजी आमदार आडम मास्तर बोलत होते.
पुढे बोलताना आडम मास्तर म्हणाले की, यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं,केंद्र सरकारने अदानी, अंबानी सारख्या भांडवलदारांचे १६ लाख कोटी कर्ज गेल्या ९ वर्षात कर्जमाफ केले. मात्र रे नगर च्या सभासदांच्या ६०० कोटी कर्जमाफी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारले असता ते चकार शब्द काढत नाही,म्हणजे गरिबांना द्यायला सरकारकडे पैसे नाहीत अशी टीका केली.
रे नगरची उभारणी करताना प्रणिती शिंदे यांनी विरोध केला,जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, असा आरोप ही आडम मास्तर यांनी केला.दरम्यान जुनी मिल चाळ मधील घरे जीर्ण झाली असून ही घरे धोकादायक झाले आहेत. ४८८ कुटुंब धोकादायक स्थितीत राहत आहेत,मला आमदार करा. एका वर्षात जुनी मिल चाळ नव्याने बांधण्याची ग्वाही आडम मास्तर यांनी दिली.
यावेळी माकप चे जिल्हा सचिव ऍड.एम.एच.शेख.यांनी आपल्या भाषणात मास्तरांनी मोठा लढा देऊन कॉ.गोदूताई परुळेकर विडी घरकुल ला पाणी मिळवून दिल, रे नगर ला देखील २४ तास पाणी आहे,मास्तर हे काम करणारे नेते असून जनतेने त्यांना चोथ्यांदा आमदार करावे असं आवाहन त्यांनी केले. यावेळी व्यासपीठावर माकप चे जिल्हा सचिव एम.एच.शेख,कॉ.युसूफ मेजर,रमेश अंधारे,रविकांत क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.