महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चेतन पंडित नरोटे यांच्या प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन !
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.६ नोव्हेंबर – सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चेतन पंडित नरोटे यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खा. प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, केवळ कामाच्या जोरावर, १५ वर्षे शहर मध्य मतदारसंघ सांभाळले, जनतेने तीन टर्म सेवा करण्याची संधी दिली, खासदार केलात, त्याच प्रमाणे सर्वांच्या सुखदुःखात सामील होणाऱ्या, काम करणाऱ्या व सर्व धर्मसमभाव मानणाऱ्या चेतन नरोटे यांना निवडून द्या असे आवाहन खा.प्रणिती शिंदे यांनी केले.
दरम्यान जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी, सोलापूरच्या विकासासाठी मला निवडून द्या असे आवाहन शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चेतन नरोटे यांनी केले.
यावेळी निवडणूक प्रमुख प्रकाश यलगुलवार, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, शिवसेनेच्या उपनेते अस्मिता गायकवाड शिवसेना नेते पुरुषोत्तम बर्डे, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष भारत जाधव, माझी महापौर यु एन बेरिया, माजी महापौर संजय हेमगड्डी, रियाज हुंडेकरी, तौफिक हत्तूरे, शौकत पठाण, सुशीला आबुटे, नलिनी चंदेले, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष सुनीता रोटे व महाविकास आघाडीचे नेते मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन सोलापूर येथे सोलापूर शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.