तुम्ही मला संधी द्या त्या संधीचे मी नक्कीच सोनं करेण – तौफिक शेख 

तुम्ही मला संधी द्या त्या संधीचे मी नक्कीच सोनं करेण – तौफिक शेख 

तौफिक शेख यांच्या सभेला होतीय युवकांची एकच गर्दी 

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१४ नोव्हेंबर –

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सर्वत्र प्रचाराची जय्यत रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक उमेदवार आपापले मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्याचा अनुषंगाने सोलापूर शहर मध्य विधानसभा  मतदारसंघातून तौफिक शेख हे अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. गतविधानसभा निवडणुकीत एम.आय.एम पक्षाकडून त्यांनी जोरदार मुसंडी मारली होती. मात्र यंदा त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी करत निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यांचे चिन्ह सफरचंद असून सध्या शहर मध्य विधानसभा मतदार संघात जोरदार प्रचार करताना दिसत आहेत.

 दरम्यान तौफिक शेख यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघ प्रचाराचा धडाकाच लावलेले आहेत. कॉर्नर मीटिंग, सभा, गुप्त बैठका सुरू झालेल्या आहेत. बापूजी नगर येथे या आली बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने तोफिक शेख यांचे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत संबोधित करताना तौफिक शेख म्हणाले,शहर मध्य  विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. माझ्या जिद्दीवर ही निवडणूक लढवत असून, एम आय एम सारख्या पक्षांना मी माझी ताकद दाखवून देणार आहे.

 

दरम्यान यावेळी या आली बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने तोफिक शेख  यांचे स्वागत करत, निवडणूक जिंकण्याचा निर्धार केला आहे.  यावेळी दौला शेख, गौस मुजावर, आजम शेख, साकिब शेख, मजहर शेख, इरफान शेख, यांसह आदींची उपस्थिती होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *