अखेर माकपने फडकवले लाल निशाण ; नामनिर्देशन अर्ज केला खरेदी

अखेर माकपने फडकवले लाल निशाण ….

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वबळाने उतरण्याचा केला निर्धार !

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्यूज ,

सोलापूर, दि. २१ ऑक्टोंबर – सर्वसामान्य कामगारांचे कैवारी, माकपची बुलंद तोफ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या माजी आमदार आडम मास्तर यांच्याकडून नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यात आला आहे. अर्ज स्विकारण्याच्या पहिल्याच दिवशी पहिल्याच प्रहरात आडम मास्तर यांचे जवळचे कार्यकर्ते अनिल वासम यांनी हा अर्ज खरेदी करून शहर मध्य विधानसभा मतदारसंघात लाल झेंडा फडकवला आहे.

 विधानसभा निवडणुकीचे नामनिर्देशन अर्ज     स्वीकारण्याच्या पहिल्या दिवशी कोणकोणते इच्छुक उमेदवार अर्ज घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. यामध्ये सर्वप्रथम माकपने बाजी मारली आहे. महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्यानंतर माकपने स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

         दरम्यान आडम मास्तर यांचे निष्ठावान कार्यकर्ते समजले जाणारे अनिल वासम यांनी दोन अर्ज खरेदी केले आहेत. प्रथम आडम मास्तर आणि द्वितीय स्वतः अनिल वासन यांच्या नावाने हे अर्ज खरेदी केले आहेत. अनिल वासम यांचा अर्ज हा मास्तर यांना पूरक असणार आहे. हे अर्ज घेतल्यानंतर वासम यांनी प्रसार माध्यमांची संवाद साधताना विधानसभा निवडणूक माकापच्या लाल झेंड्याखाली लढवण्याचा निर्णय केला असून, कोणी येऊ देत किंवा ना येऊ देत आम्ही तर मतदारांसाठी लढणार आहोत. अशी प्रतिक्रिया दिली आहे.

खुल्या वर्गासाठी दहा हजार तर राखीव वर्गासाठी पाच हजार अनामत रक्कम. 

विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराला अनामत रक्कम भरावी लागणार आहे. नामनिर्देशन अर्ज भरतेवेळी सदरची रक्कम भरावयाची आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला दहा हजार रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवाराला पाच रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *