सिनेअभिनेते पवन कल्याण यांचे हजारोंच्या गर्दीला देवेंद्र कोठे यांच्यासाठी आवाहन
नागरिकांकडून जेसीबीने फुले उधळून झाले स्वागत : रोड शो ने जिंकली सोलापूरकरांची मने…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१६ नोव्हेंबर –
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि पॉवरस्टार म्हणून ओळखले जाणारे सिनेअभिनेते पवन कल्याण यांनी शनिवारी रोड शो करीत भाजपा आणि महायुतीचे शहर मध्य मतदारसंघाचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना निवडून देण्याचे आवाहन केले. सुमारे ५ किमी अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या सोलापूरकरांची मने पवन कल्याण यांनी जिंकली.
अक्कलकोट रोड येथील पाणी टाकीजवळ सिने अभिनेते पवन कल्याण यांचे आगमन होताच उघड्या जीपमध्ये उभे राहिलेल्या अभिनेते पवन कल्याण आणि भाजपा महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांचे नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जेसीबीने फुले उधळून त्यांचे भव्य स्वागत केले. जीपमध्ये उभे राहून त्यांनी नागरिकांना देवेंद्र कोठे यांना मतदान करण्याचे आवाहन केले.
नागरिकांनीही त्यांच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद देत भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. जय श्रीराम, भारतमाता की जय, वंदे मातरम, जय मार्कंडेया अशा घोषणांनी सर्व रस्ते दुमदुमून गेले होते.