देवेंद्र कोठे यांना मिळतोय नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
दिवाळी फराळनिमित्त देवेंद्र कोठे यांनी घेतल्या लोधी समाजातील आणि भाजपातील जेष्ठ पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी….
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. १ नोव्हेंबर – शहर मध्य विधानसभा निवडणुकीतील भाजपा आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार देवेंद्र राजेश कोठे यांनी लोधी समाजातील आणि भाजपातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या शुक्रवारी भेटी घेतल्या.
दरम्यान भाजपचे नागनाथ शिवसिंगवाले, रणजीत हजारीवाले यांच्या माध्यमातून देविदास चौधरी यांच्या निवासस्थानी देवेंद्र कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक रविसिंग कैय्यावाले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी देविदास चौधरी म्हणाले, देवेंद्र कोठे हे कार्यक्षम, अभ्यासू आणि विकासाभिमुख नेतृत्व आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये त्यांनी त्यांच्या प्रभागासह शहरातील अनेक ठिकाणी विकासासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. शहर मध्य मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी देवेंद्र कोठे हे सक्षम पर्याय आहेत. त्यामुळे आगामी काळात त्यांच्याकडून शहराच्या विकासासाठी अधिक, यशस्वी प्रयत्न होतील, असेही देविदास चौधरी यांनी सांगितले.
यावेळी देविदास चौधरी, नागनाथ शिवसिंगवाले, रणजीत हजारीवाले, मकाराम कलबुर्गे, गुलजारसिंग शिवसिंगवाले, शोभूराम शिवसिंगवाले, बंडूसिंग बाबावाले, शितलसिंग हजारीवाले, मोहन दवेवाले, बन्सी कैय्यावाले, रमेश बंबेवाले, मुकेश गोरलीवाले, गुलाबसिंग आंबेवाले, दशरथ बिरबनवाले, विजय कैय्यावाले, कन्हैया खंडेवाले, सिताराम तुक्कूवाले, सुरेश बिलोरीवाले, राम वटवटवाले, आनंद मनसावाले, रविसिंग बुऱ्हाणपुरे आदी भारतीय जनता पार्टी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
युवक अन् नागरिकांची मोठी गर्दी..
दिवाळी फराळ कार्यक्रमाच्यावेळी भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार देवेंद्र कोठे यांना भेटण्यासाठी युवक आणि नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. गाठीभेटी, बैठकांचे सत्र पाहता भाजपा महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
शहर मध्य चा होणार कायापालट..
उमेदवार देवेंद्र कोठे म्हणाले, शहर मध्य मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणींची, समस्यांची मला जाण आहे. या समस्यांवरील उपायांच्या योजनाही आमच्याकडे तयार आहेत. नागरिकांना न्याय भाजपा आणि महायुतीच देऊ शकते. लोधी समाजासह सर्वांना सोबत घेऊन शहर मध्य चा कायापालट करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
देवेंद्र कोठे, उमेदवार शहर मध्य विधानसभा