देवेंद्र कोठे यांच्या विजयासाठी एकवटले सगळे एकत्र ; केला विजयी संकल्प
कोल्हे, मेकाले आणि डोंगरे पदयात्रेत झाले सामील
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१३ नोव्हेंबर –
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अधिक रंगतदार बनत चालली आहे. मतदान अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपले असून, त्या अनुषंगाने उमेदवार प्रचारच करण्यात व्यस्त झालेले आहेत. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत असून, अपक्ष उमेदवार देखील आपली ताकद आजमावत आहेत. याच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ बुधवारी भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, चंद्रकांत मेकाले आणि राजू डोंगरे यांनी एकत्र येत देवेंद्र कोठे यांना निवडून आणण्याचा निर्धार केला.
दरम्यान भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आर.पी.आय. (ए) महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ नागरिकांच्या प्रचंड संख्येच्या उपस्थितीत पदयात्रा झाली. लक्ष्मी चाळ येथून पदयात्रेस प्रारंभ झाला. यानंतर ही पदयात्रा विष्णू मिल चाळ, न्यू लक्ष्मी चाळ, साठे शिंदे वस्ती, चव्हाण वस्ती या मार्गावरून थोबडे मळा येथे विसर्जित झाली.
भारतमाता की जय, वंदे मातरम, देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, देवेंद्र कोठे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा यावेळी देण्यात येत होत्या.या पदयात्रेत माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, माजी नगरसेविका मंगला कोल्हे, चंद्रकांत मेकाले, राजू डोंगरे, बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा समन्वयक जवाहर जाजू, सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती सिद्राम अट्टेलुर, मंगेश डोंगरे, युवराज घाडगे, शिवसेनेचे उपशहर प्रमुख अभिजीत काळे, रणजीत कोकाटे, उमाकांत निकम, रोहन मराठे, पार्थ कोल्हे, गणेश भोसले, माऊली गुंड, भीमा मोरे, ज्योतीराम भोसले, ज्ञानेश्वर शिंदे, रणजीत चांगभले, बाळासाहेब सुरवसे, बाळासाहेब यादव, रवी मस्के, राहुल काटे, सलीम पठाण, सुशांत गायकवाड, अतिश चव्हाण, आरिफ निगेबान, गुलाब शेख, नवनाथ भजनावळे, विजय सातारकर, विजय साठे, जावेद शेख, वैशाली जाधव, मंगला डोंगरे, कविता चव्हाण आदी उपस्थित होते.