यंत्रमाग कामगार महामंडळाकडून देणार १५ लाखांचे बिनव्याजी कर्ज – देवेंद्र कोठोंचे आश्वासन

यंत्रमाग कामगार महामंडळाकडून देणार १५ लाखांचे बिनव्याजी कर्ज – देवेंद्र कोठोंचे आश्वासन

श्री कुरूहिनशेट्टी समाजाने दिले देवेंद्र कोठे यांना पाठबळ..

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१५ नोव्हेंबर –

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा जवळ येत आहे. जसा प्रचाराचा अंतिम दिवस जवळ येत आहे, तस् तसा प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू असलेली दिसत आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतलेली दिसत आहे.

दरम्यान यंत्रमाग कामगार महामंडळाची स्थापना करून व्यवसाय, उद्योगासाठी १५ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी दिली. श्री कुरुहिनशेट्टी ज्ञाती संस्थेतर्फे आयोजित श्री कुरुहिनशेट्टी समाज मेळावा उत्साहात झाला. या मेळाव्यात समाजातर्फे जाहीर पाठिंबाचे पत्र देवेंद्र कोठे यांना देण्यात आले.

 

याप्रसंगी व्यासपीठावर भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए ) महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी नगरसेवक मेघनाथ येमूल, संस्थेचे प्रेसिडेंट प्रा. नारायण संगा, उपाध्यक्ष ॲड. सिद्धेश्वर बुगडे, सचिव संजय बुगडे, खजिनदार श्रीनिवास जोगी, सहसचिव श्रीनिवास गडगी, शालेय समितीचे अध्यक्ष प्रभाकर गोरंटी उपस्थित होते.

 

देवेंद्र कोठे म्हणाले, श्री कुरुहिनशेट्टी समाज सर्वांना सोबत घेऊन जाणारा समाज आहे. या समाजासाठी राज्य शासनाकडून सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी प्रयत्न करू. हातमाग, वस्त्रोद्योग, यंत्रमाग, टेक्स्टाईल क्षेत्रातील कामगार आणि उद्योजकांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करू.  यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस करू. राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देण्यात येतील. चांगल्या योजना राबवणाऱ्यांच्या पाठीशी मतदारबांधवांनी रहावे, असे आवाहनही देवेंद्र कोठे यांनी यावेळी केले. या मेळाव्यास श्री कुरूहिनशेट्टी ज्ञाती संस्थेचे पदाधिकारी, विविध संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच समाजबांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *