शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी प्रबळ दावेदार – मनिष (आण्णा) काळजे 

शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी प्रबळ दावेदार – मनिष (आण्णा) काळजे

विविध सामजिक कार्यातून उमटवला वेगळा ठसा !

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि. ७ ऑक्टोंबर – सोलापूरच्या मनिष (आण्णा) काळजे यांचा कार्यप्रवास शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी एक नवीन आश्वासक चेहरा बनला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीच्या आधारावर, त्यांनी आपल्या निष्ठावान शिवसैनिकत्वाचा आदर्श ठेवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ (भाई) शिंदे यांच्या मार्गदर्शनात, काळजे यांनी सुमारे ६० कोटी रुपयांचा निधी आणून सोलापूरच्या विकासाला गती दिली आहे.

     “लाडकी बहीण” योजनेअंतर्गत, २५००० हून अधिक गरजू मातांना मदतीचा हात देत, त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला आहे. जिल्हाप्रमुख म्हणून संघटन वाढीसाठी शहर व जिल्ह्यात त्यांनि  मेहनत घेतली आहे. काळजे यांची व्यक्तिगत मदत, रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ देणे आणि सामाजिक उपक्रम राबवणे हे त्यांच्या कार्याचे काही महत्त्वाचे पैलू आहेत. नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देत, त्यांनी अनेक लक्षवेधी आंदोलने आयोजित केली आहेत. ज्यामध्ये न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्या कर्तृत्वामुळे, एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाने मनिष (आण्णा) काळजे यांचे नाव शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी प्रबळ दावेदार म्हणून समोर येत आहेत.

विविध सामजिक कार्यातून उमटवला वेगळा ठसा !

शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील असणारे मनीष काळजे यांनी सामाजिक कार्यातून आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष तसेच मुख्यमंत्री सहायता निधी या माध्यमातून अनेकांना निधी उपलब्ध करून देत सर्वसामान्य जीवनाला आधार दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *