सोलापूर शहरातील माजी नगरसेवकांनी घर वापसी तर काहींनी घेतला भाजपचा झेंडा हाती…

सोलापूर शहरातील माजी नगरसेवकांनी घर वापसी तर काहींनी घेतला भाजपचा झेंडा हाती…

बिज्जू प्रधाने 
माजी सभागृह नेते सुरेश पाटील 

 

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर प्रतिनिधी 

भाजपने ऑपरेशन लोटस अंतर्गत सोलापूर भाजपने पूर्वाश्रमीचे भाजपचे कार्यकर्ते यांची पुन्हा एकदा घरपवापसी केली आहे.  मुंबई येथे जाऊन या सर्व पदाधिकाऱ्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली आमदार सचिन कल्याणशेट्टी व आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, महिला अध्यक्षा रंजीता चाकोते यांच्या उपस्थितीत माजी उपमहापौर पद्माकर नाना काळे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, माजी सभागृह नेता सुरेश पाटील, बिज्जू प्रधाने, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर, माजी नगरसेवक सुभाष डांगे, माजी नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, मारुती तोडकरी, माजी नगरसेविका कल्पना क्षीरसागर, नागनाथ क्षीरसागर, सुनील भोसले, बिपीन पाटील, मदन क्षीरसागर, रवी काळे, मेघराज कल्याणकर, बाळासाहेब तांबे, सुरेश तोडकरी आदींनी आज भाजपा मध्ये अधिकृत प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *