सोलापूर शहर उपनिबंधक सहकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्याची होणार उचल बांगडी
माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिले निवेदन

सोलापूर दि १३ जुलै – शहरात मोठ्या प्रमाणात सहकारी गृहनिर्माण संस्थेचे जाळे पसरलेले आहेत. सोलापूर शहर उपनिबंधक सहकारी संस्था यांचे सर्व संस्थावर नियंत्रण असते. मात्र प्रत्येक सहकारी संस्थांवर नियंत्रण असणे गरजेचे असताना तसे होताना दिसत नाही.

काही सोसायटीतील चेअरमन,सेक्रेटरी, सभासद यांचा सर्वत्र मनमानी कारभार सुरू आहे. अधिकारी कर्मचारी अनेक तक्रारी आल्या आहेत. परंतु हे निर्ढावलेले अधिकारी,कर्मचारी संबंधित चेअरमन,सेक्रेटरी,सभासदांना उद्धट भाषा वापरतात. सदर ऑफिस मध्ये गेल्यानंतर प्रत्येक कामासाठी पैसे घेतल्या शिवाय कामच करत नाहीत. त्यामुळे सोलापूर शहरच्या सोसायटीतील चेअरमन,सेक्रेटरी,सभासद यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक सोसायटीतील चेअरमन सेक्रेटरी,सभासद यांनी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना समक्ष भेटून वरील उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर कार्यालयातील होणारा भ्रष्टाचार, होणारा आर्थिक,मानसिक, त्रास कुठेतरी थांबावा ह्यासाठी तक्रारी केल्या आहेत. सदर कार्यालयात बायोमेट्रिक मशीन नाही त्यामुळे ऑफिसच्या वेळेत कोणी येत नाही त्यामुळे सभासद नागरिक यांना तासनतास ताटकळत वाट पाहत बसावे लागते. कित्येक वर्षापासून काही कर्मचारी यांच्या बदल्या झाली नाहीत. आर्थिक देवाणघेवाण करूनच कामे केली जात आहेत त्यामुळे त्यांची मक्तेदारी निर्माण झाली असून भ्रष्टाचार बोकाळला आहे.ठराविक संस्थेचे चेअरमन, सेक्रेटरी,ऑडिटर यांच्याशी हात मिळवणी करून त्यांच्या सांगण्यावरून कामे केली जातात. सभासदांच्या हिताचा विचार केला जात नाही कित्येक संस्थेचे चेअरमन सेक्रेटरी हे कायदा नियम मंजूर उपनिधीतील तरतुदीने पालन करीत नाहीत असे निदर्शनास आणून दिले असताना देखील उपनिबंधक यांचे कडून अशा गैरकारभार करणाऱ्या संस्थावर कारवाई करण्यात येत नाही. अशा संस्थांवर प्राधिकृत अधिकारी नेमून योग्य कारवाई करणे गरजेचे आहे परंतु तसे केले जात नाही उपनिबंधक यांच्याकडे तक्रारी अर्ज किंवा पत्र दिले असता निर्णय घेण्यास सक्षम असताना उपनिबंधकाच्या अखत्यारीतील असताना तो प्रश्न न सोडवता उद्धटपणे कोर्टात जा असे अरे-रावीची भाषा वापरतात.
अशा मुजोर अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात अनेक तक्रारी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. सदरचा गैरप्रकार थांबवण्यासाठी माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन दिले असून लवकरच संबंधित भ्रष्टाचारी अधिकारी कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच कित्येक वर्षापासून एकाच ठिकाणी वशिल्याने नियुक्ती करून बसलेले अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी करून तात्काळ बदली करावी असे निवेदनात म्हटले आहे.