भाजप कार्यालय परिसरात एकच जल्लोष ; शहर भगवेमय केल्याने साजरा केला आनंदोत्सव 

भाजप कार्यालय परिसरात एकच जल्लोष ;

शहर भगवेमय केल्याने साजरा केला आनंदोत्सव !

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२४ नोव्हेंबर – 

राज्यातील महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन करता आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीला मिळालेल्या न भूतो न भविष्य घवघवीत यश मिळाल्याबद्दल, भाजपा शहर कार्यालया समोर भाजपच्या पदाधिकारी यांनी जल्लोष करून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

 

        भाजप येथील कार्यालयासमोर दुपारी तीन वाजता मोठा जल्लोष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याने सदरचा जल्लोष करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीला दसरा-दिवाळी सणासाठी भेट म्हणून दीड हजार रुपये थेट अकाउंट मध्ये जमा केल्याने तसेच अडीच वर्षात न भूतो न भविष्य असा विकास करून दाखवला, अशा अनेक जनतेच्या, विशेष करून शेतकऱ्यांसाठी हिताचे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे जनतेने आम्हाला पुन्हा एकदा सत्तेवर आणले आहे असे प्रतिक्रिया राज्याचे तीनही प्रमुख नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, आणि अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

     दरम्यान स्थानिक पातळीवर देखील जनतेने महायुती आणि पर्यायाने भाजपला साथ देत, जनतेने भुलथापांना बळी न पडता महायुती सरकारला भरभरून प्रतिसाद देऊन एक हाती सत्ता मिळवुन दिल्याबद्दल जनतेचे आभार मानण्यात आले. भाजपा शहर कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला यावेळी शहर सरचिटणीस पांडुरंग दिंडी, विजया वड्डेपल्ली, दत्तात्रेय पोसा, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नगरसेविका राजश्री चव्हाण, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप शिंदे, अनिल सरगम, सुभाष मोडे, रमेश बिंगी ,अनिल चव्हाण,असे असंख्य भाजप पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून जल्लोष केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *