सोलापूर बजरंग दल आणि पोलीस आयुक्तालयाची संयुक्त कारवाई 17 गोवंश कत्तलीपासून वाचवले…
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २२ जून :- बजरंग दल सोलापूरच्या गोरक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर विजापूर वेस कुरेशी गल्ली येथे काही गोवंश कत्तलीसाठी डांबून ठेवलेली आहेत त्यांची पहाटे अवैधरित्या कत्तल होणार आहे अशी माहिती मिळाली. त्यानुसार सदर माहिती सोलापूर शहर पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांना दिली. त्वरित पहाटेच्या वेळी जेलरोड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना माहिती दिली पहाट वेळी एक पोलीस पथक घटनास्थळी रवाना केले.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार घटनेस्थळी छापा केले असता त्या ठिकाणी 9 देशी व जर्सी गोवंश हे कत्तलखान्यावर कत्तलीच्या उद्देशाने ठेवण्यात आली होती व बाजूच्या पत्रा शेडमध्ये 8 म्हैस वर्गीय 3 खोंड व 5 कालवड बांधलेली होती काहीच वेळात त्यांची कत्तल होणार होती. पोलिसांनी त्वरित महानगरपालिकेमार्फत अतिक्रमण विभागाचे गुरे वाहन गाडी घटनास्थळी दाखल करून त्यातून सर्व 17 गोवंश सुखरूपपणे अहिंसा गोशाळा सोलापूर येथे सोडण्यात आले. दरम्यान यामध्ये आरोपी जुबेर आ.कयूम कुरेशी, शदाब बिलाल पंजाबी यांच्यावर प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 अंतर्गत 11 (1)(f),13,3,9,महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 5,9,11 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई यशस्वी करण्याकरिता सोलापूर शहर पोलीस उपायुक्त विजय कबाडे,जेलरोड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहपोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार, पीएसआय निलेश सोनवणे ॲनिमल वेल्फेअर ऑफिसर महेश भंडारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कारवाई यशस्वी करण्याकरिता बजरंग दल सोलापूर जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी सह गोरक्षा प्रमुख पवनकुमार कोमटी तसेच आदी गोरक्षकांनी अथक परिश्रम घेतले.