अवंती नगर परिसरास पाण्याचा वेढा गणेश, यश, आर्यनंदी नगरात शिरले पाणी सुमारे दोन हजार नागरिकांचा सुरक्षा एरणीवर 

अवंती नगर परिसरास पाण्याचा वेढा

गणेश, यश, आर्यनंदी नगरात शिरले पाणी सुमारे दोन हजार नागरिकांचा सुरक्षा एरणीवर 

सोलापूर प्रतिनिधी

सोलापूर शहरातील जुना पूना नाका येथे पुन्हा एकदा वाहत्या पाण्याची पातळी वाढल्याने अवंती नगर परिसरातील गणेश नगर, वसंत विहार, आर्यनंदी नगर, राधाकृष्ण कॉलनी पुन्हा पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील विविध नाले ओसंडून वाहत असल्याने हे पाणी शहरी तसेच लोकवस्ती भागात शिरलेले आहे. वाहत्या पाण्याचा प्रवाह पाहता हे पाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्याने परिसरात राहणाऱ्या सुमारे दीड ते दोन हजार नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला दिसत आहे.

     दरम्यान, सोलापूर शहरात तसेच जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी लागत आहे. बुधवारी रात्री सुरू झालेला पाऊस अद्यापही शहर जिल्ह्यास झोडपून काढत आहे. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर, दक्षिण, अक्कलकोट त्यानंतर आता करमाळा तालुक्यात पावसाच्या पाण्याने हाहाकार माजवला आहे. ग्रामीण भागातील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत शहरी लोकवस्तीमध्ये शिरत आहे. शहराच्या मध्यवर्ती जुना पुणे नाका येथील अवंती नगर परिसरातील विविध भागात पावसाच्या पाण्याचा वेढा वाढत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अवंती नगर येथील नाल्याकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत.

अवंती नगर परिसरात जमिनीतून पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…

सोलापूर शहरांमध्ये गेल्या अनेक वर्षानंतर असा मोठा पाऊस झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण आहे. गेल्या बुधवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सखलभाग पाण्याखाली गेलेली आहेत. तर नागरी वस्तीमध्ये देखील जमिनीतून पाणी बाहेर येत असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.  वरून पावसाचे पाणी खालून झिरपत असलेले पाणी अशा दुहेरी संकटात नागरिक सापडले आहेत. नाल्यातून पाण्याचा प्रवाह हा मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. त्यामुळे पावसाचा जोर आणखीन वाढल्यास अनेक घरे पाण्याखाली जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

हिप्परगा तलावातील पाण्याचा प्रवाह वाढला 

शहरानजीक असलेला हिप्परगा तलाव ओव्हर फ्लो झाल्याने हे पाणी शहरी भागात वाहून येत आहे. शहरी भागातील बाळे आणि जुना पुणे नाका परिसरात पाणीच पाणी साचत असल्याने शहरात पुन्हा एकदा पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होतय का ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *