बाजार समितीसाठी उद्यापासून भरा अर्ज…..!
निवडणूक प्रक्रिया जाहीर १० नोव्हेंबरला होणार मतदान.
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. ६ ऑक्टोंबर – सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. सोमवार, सात ऑक्टोबरपासून अर्ज भरता येणार असून १० नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
पावसाळ्याचे कारण देत राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व सहकारी संस्था आणि पणन विभागाकडील बाजार समित्यांच्या निवडणुकांना ३० सप्टेंबरपर्यंतची स्थगिती दिली होती. ही मुदत संपल्याने सहकारी पतसंस्था आणि बाजार समित्यांच्या निवडणुका घ्याव्यात, असे परिपत्रक राज्य सरकारने काढले आहे. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून १० नोव्हेंबर रोजी मतदान, ११ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिली आहे.
निवडणूक प्रक्रिया कार्यक्रम
• ७ ते ११ ऑक्टोबर- अर्ज भरणे
• १४ ऑक्टोबर- अर्ज छाननी
• १५ ते २९ ऑक्टोबर- अर्ज मागे घेणे
• २९ ऑक्टोबर- उमेदवार यादी
• १० नोव्हेंबर- मतदान
• ११ नोव्हेंबर रोजी मतमोजणी