Solapur APMC Market सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पूर्णब्रह्म योजनेला लागली घरघर……

Solapur APMC Market सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पूर्णब्रह्म योजनेला लागली घरघर……

शेतकऱ्यांची संख्या रोडावल्याने योजना सुरू ठेवणे बनले कठीण……

सोलापूर दि ३ ऑगस्ट – शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पोटभर जेवण उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून पूर्णब्रह्म योजना सुरू करण्यात आली होती. मात्र सद्यस्थितीत या योजनेला उतरती कळा लागली आहे. शेतकऱ्यांची संख्या घटल्याने योजना सुरू ठेवणे मक्तेदाराला कठीण जात आसल्याचे चित्र दिसत आहे.

        सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून एक नवीन अभिनव संकल्पना राबवण्यात आली होती. तत्कालीन सभापती दिलीप माने यांच्या कार्यकाळात इतर गावातून आणि जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांना अगदी माफक दरामध्ये चांगल्या आणि उत्तम जेवणाची सोय व्हावी हा त्यामागील उद्देश होता. त्यानुसार शेतकरी एक रुपये , बाजार समिती चोवीस रुपये , आणि अडत व्यापारी पंधरा रुपये असे एकूण चाळीस रुपयांमध्ये पूर्ण थाळी शेतकऱ्यांना उपलब्ध करण्यात आली होती.

              त्या काळात पूर्णब्रह्म योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. बाजार समितीच्या आडत व्यापाऱ्यांनी कार्यालयातून कुपन खरेदी केले. सातशे रुपयांचे १०० पानाचे तीन कूपन बुक अडत व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना देण्यासाठी देण्यात आले. सुरुवातीच्या काळात अडत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना हे कूपन जेवणासाठी उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे योजनेला चांगला प्रतिसाद मिळत होता. अनेक शेतकरी पोटभर जेवून तृप्त झाले.परंतु कालांतराने योजनेचे कुपन घेणे अडत व्यापाऱ्यानी बंद केले.

           दरम्यान बाजार समितीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही दखल घेतली नाही. हळूहळू त्याचा परिणाम योजनेकडे पाठ फिरवली गेली. प्रशासकीय यंत्रणा , संबंधित आडत व्यापारी , यांचे दुर्लक्ष होत गेल्याने सध्या योजना डबघाईला आली आहे. योजनेद्वारे खानावळ चालवणे मक्तेदारास जिकरीचे बनले आहे. दिवसातून हातावरच्या बोटा इतके शेतकरी जीवनासाठी येत आहेत.त्यामुळे योजना सुरू ठेवणे आणि योजनेसाठी लागणारे विविध साहित्य खरेदी करणे , देखभाल दुरुस्ती करणे , आदी कामे ठेकेदार मल्लिनाथ सोरेगाव यांना अडचणीचे ठरत आहे.

योजना सुरू ठेवण्यासाठी बाजार समिती प्रशासन आणि अडत व्यापाऱ्यांनी घ्यावी बैठक…

बाजार समिती प्रशासन आणि अडत व्यापारी यांच्या संयुक्तरीत्या कामगिरीतून योजना सुरू ठेवणे महत्त्वाचे आहे. बाजार समितीने जर व्यापाऱ्यांना कूपन घेणे आवश्यक केले, तर अडत व्यापारी कुपन बुक खरेदी करतील आणि शेतकऱ्यांना ते वाटप करतील. त्यामुळेच योजना आणि खानावळ पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने सुरू राहील. यासाठी प्रशासनाने अडत व्यापाऱ्याची बैठक घेऊन चर्चा करावी.

– मल्लिनाथ सोरेगाव , ठेकेदार पूर्णब्रह्मयोजना सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *