बाजार समितीत नवा गडी नवे राज्य ; सभापती माने नंतर सचिवपदी रजपूत यांची निवड! 

बाजार समितीत नवा गडी नवे राज्य ; सभापती माने नंतर सचिवपदी रजपूत ! 

अतुलसिंह रजपूत यांची बाजार समितीच्या प्रभारी सचिवपदी निवड जाहीर…

व्हि आर पवार… उत्कृष्ट वस्त्रदालन एक वेळ अवश्य भेट द्या…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.४ जून

सोलापूर बाजार समितीत नवा गडी नवे राज्य सुरू झाले आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिक्त झालेल्या सचिव पदावर प्रभारी अतुलसिंह रजपूत सचिव नियुक्त करण्यात आला आहे. समिती प्रशासनात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेले अतुलसिंह रजपूत यांची प्रभारी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दत्तात्रेय सूर्यवंशी यांच्या निवृतीमुळे हे पद रिक्त झाले होते.

अतुल सिंह राजपूत

    दरम्यान, बाजार समितीचे पंचवार्षिक निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीत दिलीप माने यांच्या पॅनलने पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणत, बाजार समिती प्रशासनावर आपला दबदबा कायम ठेवला आहे. मात्र त्यानंतर बाजार समितीच्या सचिव पदावर कोणाची वर्णी लागणार याबाबत काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. ३६०० कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव पदासाठी कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. पडद्याआडून यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. संचालक मंडळाने सचिव पदाच्या निवडीसाठीचे सर्वाधिकार बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांना दिले होते. त्यांनी रजपूत यांची निवड केली आहे. रजपूत हे प्रशासकीय कामकाजात निपुण असल्याची चर्चा आहे. मात्र कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असतानाही त्यांची निवड केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. निवड करताना सेवा ज्येष्ठता डावलल्याची चर्चा आहे. काही कर्मचारी उघड नाराजी व्यक्त करत नसले तरी त्यांच्या मनात खदखद आहे. बाजार समितीच्या कारभारात सक्षम सचिवा ऐवजी संचालक मंडळाच्या मर्जीन कारभार करणारा व्यक्तीच सचिव पदाच्या खुर्ची टिकतो हा आजवरचा इतिहास आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *