सोलापूर बाजार समितीच्या सचिवपदी दत्तात्रय सूर्यवंशी ; प्रशासक मोहन निंबाळकरांनी पाठवला प्रस्ताव 

सोलापूर बाजार समितीच्या सचिवपदी दत्तात्रय सूर्यवंशी ; प्रशासक मोहन निंबाळकरांनी पाठवला प्रस्ताव…..!

प्रशासक कार्यकाळात बाजार समितीमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये साधना समन्वय…..!

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.३० नोव्हेंबर 

कांद्याच्या उलाढालीसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये  प्रसिध्द असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला गेल्या दहा वर्षापासून पूर्णवेळ सचिव नव्हता. गेल्या दहा वर्षात बाजार समितीचा कारभार प्रभारी सचिवावर चालू होता. मात्र आता प्रभारी सचिव दत्तात्रय सुर्यवंशी यांनाच पूर्णवेळ सचिव म्हणून नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे बाजार समितीला तब्बल दहा वर्षाने आता हक्काचा आणि कायमचा सचिव मिळाल्याची चर्चा बाजार समितीच्या वर्तुळामध्ये रंगली आहे.

     

  दरम्यान, शासकीय प्रशासक मोहन निंबाळकर यांनी सुर्यवंशी यांचे स्वागत व सत्कार केला. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल मोठी आहे तर बाजार समितीची स्थाना १९६१ साली करण्यात आली आहे. त्यावेळी पहिले शासकीय सचिव म्हणून स्व. दा. का. थावरे यांनी काम पाहिले होते. त्यांच्या नंतर १९६१ ते १९८५ पर्यंत स्व. एम. बी. जंगम यांनी बाजार समितीचे सचिव म्हणून काम पाहिले होते. यानंतर १९८५ ते २०१६ पर्यंत डी. व्ही. कमलापूरे यांनी बाजार समितीचे सचिव म्हणून काम पाहिले. त्यानंतर यु. आर. दळवी, व्ही. एस. पाटील, मोहन निंबाळकर, एम. ए. बिराजदार, सी. ए. बिराजदार यांनी प्रभारी सचिव म्हणूनच काम पाहिले होते. गेली दहा वर्ष बाजार समितीचा कारभार प्रभारी सचिवावरच सुरु होता. नुकतीच प्रभारी सचिव दत्तात्रय सुर्यवंशी याची पूर्णवेळ सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

प्रशासक निंबाळकर आणि बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या प्रशासक कार्यकाळ सुरू आहे. बाजार समितीचे प्रशासक म्हणून शासनाने मोहन निंबाळकर यांची नेमणूक केली आहे. यापूर्वी त्यांनी सोलापूर बाजार समितीचे सचिव म्हणून कामकाज पाहिले आहे. त्यामुळे प्रशासक काळात बाजार समितीचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात योग्य समन्वय दिसून येत आहे. प्रत्येक विभागाप्रमुख यांच्यासोबत कर्मचारी यांचा ताळमेळ साधून बाजार समितीमध्ये कार्य सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *