अखेर भाजपच्या कार्यकर्त्यासाठी दोन देशमुख येणार एकत्र ! तर…. मी पण त्यांच्या सोबत राहणार – विजय देशमुखांनी केली भूमिका जाहीर

सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीचे वारे बदलले ; अखेर भाजपच्या कार्यकर्त्यासाठी दोन देशमुख येणार एकत्र  !

सुभाष देशमुख भाजप कार्यकर्त्यांच्या मागे.. तर मी पण त्यांच्या सोबत राहणार – विजय देशमुखांनी केली भूमिका जाहीर

व्यापारी मतदारसंघातून मुश्ताक अहमद चौधरी व वैभव बरबडे यांचे नाव निश्चित 

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१६ एप्रिल

शेतमालाच्या विक्रमी उलाढालीसाठी सुप्रसिद्ध असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात वेगळ ट्विस्ट आले आहे. सोलापूर बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी जेष्ठ आमदार सुभाष देशमुख हे पॅनल उभे करणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यानंतर भाजप आमदार तथा माजी सभापती तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे त्यावेळचे विरोधक आमदार विजयकुमार देशमुख यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत सुभाष देशमुख यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समितीच्या गत निवडणुकीत आमने सामने निवडणूक लढून जिंकणारे माजी सभापती व आमदार विजयकुमार देशमुख यांनी यंदाच्या निवडणुकीत हातात हात घालून निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरवलेले दिसत आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या कल्याणासाठी दोघेजण एकत्रित येऊन भाजपचे पॅनल उभे करणार असल्याचे दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर जर अन्याय होत असेल, तर आम्ही भाजप पॅनल तयार करून निवडणूक लढवू असा इशारा दिला आहे.

        दरम्यान, माजी सभापती तथा आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, यानिवडणुकीत मी भाग घेणार नाही. हे यापूर्वी सांगितले आहे. परंतु सुभाष देशमुख हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे पॅनल उभे करणार असतील, तर त्यांना माझा पाठिंबा असेल, मी भाजप कार्यकर्त्यांसाठी त्यांच्या सोबत राहणार असे सांगताना जिल्हाध्यक्षांना मुख्यमंत्र्यांनी सर्व अधिकार दिले आहेत. हे आम्हाला माहीत नाही. तसे कोणी सांगितले ही नाही. असे म्हणत आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.

व्यापारी मतदारसंघातून मुश्ताक अहमद चौधरी व वैभव बरबडे निश्चित…

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत व्यापारी मतदारसंघातून एक मतांनी दोन नावे फायनल करण्यात आले आहेत. त्यामध्ये मुस्ताक अहमद चौधरी व वैभव बरबडे यांचा समावेश आहे. व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीतून या नावांवर सर्वांना मते शिक्कामोर्तब करण्यात आले.राणी लक्ष्मीबाई मंडई गटातून मुस्ताक अहमद चौधरी, जुबेर बागवान आणि फयाज बागवान हे तीन नावे पुढे आली होती. त्यामध्ये भुसार आडत व्यापारी संघाच्या कार्यालयात बैठक होऊन मुस्ताक चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. तर दुसरे नाव हे वैभव बरबडे यांचे नाव फायनल करण्यात आले आहे. बरबडे हे आमदार विजयकुमार देशमुख समर्थक मानले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *