सत्ताधारी भाजप काँग्रेसच्या नेत्यांचे श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल ; माने, हसापुरे गटाचे १५ उमेदवार जाहीर
माजी संचालक शेळकेंचा पत्ता कट ; वेटिंग नंतर नरोळेंचे आले नाव यादीवर ; तर नव्याने गणेश वानकरांना लॉटरी..
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१६ एप्रिल
संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी भाजप काँग्रेस युतीने श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल स्थापन केले आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे यांच्या गटाच्या श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल विरुद्ध आमदार सुभाष देशमुख प्रणित पॅनल अशी आता ही निवडणूक रंगणार आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. आमदार सचिन कल्याणशेट्टी, दिलीप माने सुरेश हसापुरे हे प्रमुख नेते दिवसभर शासकीय विश्रामगृहावर ठाण मांडून होते. पॅनलमध्ये जाण्यासाठी अनेक नेत्यांनी दिवसभर प्रयत्न केले. दुपारी बाराच्या सुमारास आपल्याला उमेदवारी मिळणार नाही याची चाहूल लागताच माजी संचालक बाळासाहेब शेळके यांनी शासकीय विश्रामगृहातून काढता पाय घेतला.
त्याचप्रमाणे माजी संचालक सिद्धाराम चाकोते, राष्ट्रवादीचे नेते किसन जाधव, उपसभापती श्रीशैल नरोळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील, माजी सभापती अशोक देवकते, बक्षी हिप्परगा माजी सरपंच विश्रांत गायकवाड यांच्यासह उमेदवारी अर्ज दाखल केलेले बडे नेते उपस्थित होते. परंतु दिवसभराच्या वेटिंग नंतर शेवटच्या क्षणी माजी उपसभापती श्रीशैल नरोळे यांचा पॅनल मध्ये समावेश झाल्याचे पाहायला मिळाले. सिद्धाराम चाकोते, अशोक देवकते, हरीश पाटील यांच्या पदरी निराशा आली.
तर राजशेखर शिवदारे हे सुद्धा पॅनल मध्ये सहभागी झाले आहेत. तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर, मार्डीचे सरपंच अविनाश मार्तंडे, बोरामणीचे रवी रोकडे, माजी सभापती इंदुमती अलगोंडा, केदार विभुते त्यांच्या पत्नी अनिता विभुते, सुनील कळके, सुभाष पाटोळे, उदय पाटील, संगमेश बगले, प्रथमेश वसंत पाटील, नागन्ना बनसोडे यांना मात्र लॉटरी लागली आहे त्यांचा पॅनल मध्ये समावेश झाला आहे.
श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलचे १५ उमेदवार
सोसायटी सर्वसाधारण
दिलीप माने,( तिऱ्हे )
सुरेश हसापुरे, ( निम्बर्गी )
राजशेखर शिवदारे, ( इंगळगी )
श्रीशैल नरोळे(लिबीचिंचोळी),
प्रथमेश पाटील(भंडारकवठे),
उदयकुमार पाटील (संजवाड) नागण्णा बनसोडे (नांदणी) सर्वसाधारण महिला इंदुमती अलगोंड-पाटील(वडकबाळ) अनिता केदार विभूते (बोरामणी) सोसायटी ओबीसी प्रवर्ग अविनाश मार्डंडे (मार्डी) भटक्या जाती -जमाती सुभाष पाटोळे(होटगी स्टेशन) ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण गणेश वानकर संगमेश बगले (लवंगी) आर्थिक दुर्बल घटक सुनील कळके (मुस्ती) अनुसूचित जाती- जमाती रवींद्र रोकडे (बोरामणी)