बाजार समितीची निवडणूक दोन महिने पुढे जाण्याची शक्यता ! मतदार यादीची मुदत आली संपुष्टात ;

बाजार समितीची निवडणूक दोन महिने पुढे जाण्याची शक्यता !

मतदार यादीची मुदत आली संपुष्टात ; नव्याने तयार होणार मतदारयादी ? 

नव्याने मतदार यादी बनवण्याचे कामकाज होऊ शकते – प्रशासक मोहन निंबाळकर..

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१२ डिसेंबर

विधानसभा निवडणुकीनंतर आता वेध महापालिका, बाजार समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे लागले आहेत. सद्य:स्थितीत सोलापूर महापालिका आणि बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शहर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळी आत्ता पासूनच सरसावले आहेत. सत्ताधारी महायुती आणि विरोधक महाविकास आघाडी यांच्यातच खरी लढत असणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी बाजार समितीच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरू झाली होती. परंतु विधनाभा निवडणुकीमुळे बाजार समितीच्या निवडणुकीला ३१ डिसेंबर पर्यंत स्थगिती देण्यात आली होती. आता बाजार समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असला तरी, बाजार समितीच्या मतदार यादीचा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. कायद्याच्या तरतुदीनुसार कोणत्याही निवडणुकीची मतदार यादी तयार करताना सहा महिन्याचा कालावधीचा विचार केला जातो. दर सहा महिन्यांच्या कालावधीतनंतर नवीन मतदार यादी बनविण्याचे कामकाज केले जाते. त्यानुसार मृत, किंवा स्थलांतरित नागरिक यांची नोंद घेऊन अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येते.

             दरम्यान, जेव्हा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी बनविण्यात आली तेव्हा ती सहा महिन्याच्या कालावधीतील होती. मात्र त्यानंतर बाजार समितीच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे मतदार यादीची सहा महिन्याची मुदत संपली आहे. आता पुन्हा नव्याने मतदार यादी तयार करणार का? का अगोदरच्या मतदार यादीवरच निवडणूक घेणार आहे. हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. वास्तविक पाहता, दि. १ जून ते २ डिसेंबर रोजीचा सहा महींन्याचा कालावधी उलटून गेला आहे. त्यामुळे त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीसाठी पुन्हा नव्याने मतदार यादी बनविण्याचे काम सुरू केले जाते का हे पाहणे आवश्यक बनले आहे. जर नवीन मतदार यादी बनवण्याचे कामकाज हाती घेतले तर, निवडणुकीसाठी आणखीन एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुका या फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होऊ शकतात असा अंदाज आता वर्तवला जात आहे.

नव्याने मतदार यादी बनवण्याचे कामकाज होऊ शकते. 

कायद्याच्या तरतुदीनुसार कोणत्याही निवडणुकीसाठी सहा महिन्यांच्या कालावधीनंतर नवीन मतदार यादी केली जाते. जुन्या मतदार यादीतील मतदारांची नावे तपासली जातात. त्यानंतर सदरची मतदार यादी अपडेट होते. नियमानुसार सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला असल्याने, मतदार यादी बनवण्याचे कामकाज होऊ शकते. मात्र नवे मंत्रिमंडळ  स्थापन झाल्यानंतर यावर निर्णय होईल. अशी शक्यता आहे.

मोहन निंबाळकर, पणन उपसंचालक तथा प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *