बाजार समितीच्या निवडणूकांना भाजपाच्याच आमदारांनी दिला खो…!

बाजार समितीच्या निवडणूकांना भाजपाच्याच आमदारांनी दिला खो…!

नवीन मतदार यादी जाहीर केल्यानंतरच निवडणुका घेण्याची केली होती मागणी…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१२ जानेवारी

राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आपल्या पदाचा पदभार घेतल्यानंतर तातडीने पणन विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या आडवा बैठकीत मंत्री रावल यांनी विविध प्रस्तावांवर सकारात्मक चर्चा केली. तसेच राज्यातील विविध बाजार समित्यांची होऊ घातलेल्या निवडणुकीबाबत देखील आढावा घेऊन, नवीन मतदार यादी जाहीर केल्यानंतरच निवडणूक घेण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या.

         दरम्यान, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक देखील यापूर्वीच पुढे ढकलण्याचे आदेश पणन विभागामार्फत देण्यात आले होते. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत बाजार समितीच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती. मात्र त्यामध्ये वाढ करण्यात आली असून नवीन मतदार यादी जाहीर झाल्यानंतरच निवडणुकीची पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी नवीन मतदार यादी तयार करण्याचे कामकाज सुरू करण्याचे सूचना देखील यावेळी देण्यात आल्या आहेत.

            राज्यातील विविध बाजार समिती प्रशासनाच्या वतीने बाजार समितीमधील विविध विकास कामे व सुधारणा बाबतचे प्रस्ताव पणन संचालकांकडे दाखल झालेले आहेत. या प्रस्तावांवर मंत्री जय कुमार रावल, पनण संचालक तसेच उपसंचालक आणि इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून अंतिम अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील मंत्री रावल यांनी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे पणन विभागातील प्रलंबित विषयांयावर देखील साधक-बाधक चर्चा करण्यात आली. विभागातील विविध प्रलंबित विषय तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश देखील यावेळी देण्यात आले आहे.

विविध सुधारणा प्रस्ताव पणन विभागाकडे दाखल

राज्यातील विविध बाजार समितीमधील सुधारणांचे प्रस्ताव पणन संचालक कार्यालयाकडे दाखल झाले आहेत. सोलापूर बाजार समिती मधील देखील सुधारणा प्रस्तावांचा यात समावेश आहे. सादर झालेल्या अशा या विविध प्रस्तावांवर आढावा बैठक घेण्यात आली. सुधारणा आणि विकास कामाचे प्रस्तावांना मंजुरी देण्यात येऊन अंतिम अहवाल सादर करावेत. अशा सूचना आढावा बैठकीत मंत्री जयकुमार रावल यांनी पणन विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मतदारांची संख्या वाढणार तर परवाना रद्द झालेले मतदार कमी होणार. 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये नवीन मतदारांची संख्या वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. काही नवीन व्यापाऱ्यांना परवाने जारी केल्याने सुमारे ८५ मतदारांची संख्या वाढणार आहे. तर काही व्यापाऱ्यांची परवाने सेस रक्कम अदा केली नसल्याने त्यांची परवाने रद्द करण्यात आली आहेत. परवाने रद्द करण्यात आल्याने त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येतील. त्याच पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांनी काही ग्रामपंचायतीमधील सदस्यांचे सदस्यत्व रद्द केल्याने त्यांची नावे देखील मतदार यादीतून वगळण्यात येतील. त्यामुळे नवीन मतदार यादी जाहीर झाल्यानंतर मतदारांची संख्या करणार आहे.

भाजपच्या आमदारांनीच बाजार समितीची निवडणूक पुढे ढकलण्याची केली होती मागणी

सत्ताधारी भाजपच्या आमदारांनीच बाजार समितीची निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी केली होती. अशी माहिती समोर आली आहे. सत्ताधारी आमदारांनी ही मागणी केल्याने मुख्यमंत्री व पणन मंत्र्यांना साहजिकच बाजार समितीची निवडणूक पुढे ढकलावी लागलेली आहे. त्यामुळे पणन विभागाचा निवडणूक पुढे ढकलण्यात कोणताही रस नव्हता असे देखील यावेळी सांगण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *