श्रीसिध्देश्वर बाजार समितीमध्ये “डाळींबाची” विक्रमी
१३ हजार कॅरेटची आवक ; दर मिळतोय ३०० पर्यंत शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान

सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर प्रतिनिधी
कांदा,बेदाणे मार्केट विक्रीमध्ये अनेक विक्रम करणा-या श्रीसिध्देश्वर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदा डाळिंबाची विक्रमी आवक होत आहे. डाळींबाची मार्केटमध्ये १२ हजार कॅरेटची आवक होत असुन किमान डाळींबाला किमान २० ते कमाल ३०० रुपये भाव मिळत असल्याने आवकमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

श्री सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली बाजार समिती नवनवीन उच्चांक करीत असुन कांदा विक्रीसाठी व बेदाणे मार्केट मध्ये शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तर डाळिंब कॅरेट ऐवजी किलोवर विक्रीचा निर्णय घेतला असल्याने बाजार समितीमध्ये डाळींबाची आवक देखील वाढली आहे.दररोज ११ हजार ते १२ हजार कॅरेट डाळींब विक्रीसाठी येत असुन गुणप्रतीनुसार २० रुपयांपासून ३०० रुपये प्रती किलो दर मिळतो असल्याने व वजन काटे व बिलांच्या विश्वासाहर्ता यामुळे आवक वाढली आहे.
शेतकऱ्यांचे विश्वासार्हतेमुळे आवक वाढली – सभापती दिलीप माने
श्री. सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळींबाची दिवसेदिवस आवक वाढत असून त्यांच्या मालाचे योग्य वजन,विक्री नंतर बिलाची रक्कम व आवश्यक सोयी-सुविधा याकडे लक्ष देण्याच्या सुचना दिल्या असुन डाळींब उत्पादकांच्या विश्र्वासामुळे लांबून मालाची आवक होत असल्याचे सभापती दिलीप माने यांनी सांगितले.