मार्केट कमिटीचे सत्ताधारी विरुद्ध राज्याचे सत्ताधारी अशी होणार लढत
बाजार समिती निवडणुकीच्या रिंगणात ७० उमेदवार ; मार्केट कमिटीचे सत्ताधारी विरुद्ध राज्याचे सत्ताधारी अशी होणार थेट लढत…
एकूण ३९१ उमेदवारांपैकी ३२१ उमेदवारांनी घेतले नामनिर्देशन अर्ज मागे
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१६ एप्रिल
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण ३९१ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सादर केले होते. नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी एकूण ३९१ उमेदवारांपैकी ३२१ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता बाजार समितीच्या एकूण १८ जागेसाठी सुमारे ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.
दरम्यान, राज्यात विक्रमी आर्थिक उलाढालीसाठी राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपलाच झेंडा राहावा यासाठी सत्ताधारी भाजप काँग्रेस नेते मंडळींनी युती करत श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल स्थापित केले आहे. तर या पॅनल विरोधात माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनल तयार करून सत्ताधाऱ्यांसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. सदरच्या निवडणुकीत दोन पॅनल व अपक्ष असे एकूण ७० उमेदवार रिंगणात असणार आहेत. अशातच माजी सभापती तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांची साथ सोडलेली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यासाठी त्यांनी पूर्वाश्रमीचे विरोधक आमदार सुभाष देशमुख यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे सदरची निवडणूक अधिक रंगतदार आणि चुरशीची ठरणार आहे.
दरम्यान बाजार समितीची ही निवडणूक मार्केट कमिटीचे सत्ताधारी विरुद्ध राज्याचे सत्ताधारी अशी ठरणार असून ही निवडणूक कोण जिंकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
नामनिर्देशन अर्ज मागे घेणाऱ्यांची संख्या
सहकारी संस्था मधून – १०९
महिला- १९
ओबीसी-२०
व्हि.जे.एन. टी– २९
ग्रामपंचायत सर्वसाधारण – ८६
एससी.एसटी – १६
आर्थिक दुर्बल – ०६
व्यापारी – ३१
हमाल तोलार – ५
निवडणूक रिंगणात असलेले ७० उमेदवार पुढील प्रमाणे
सर्वसाधारण – १९
महिला – ४
ओबीसी -४
व्ही जे एन टी – ६
ग्रामपंचायत सर्वसाधारण – १०
एसीएसटी – १०
आर्थिक दुर्बल – ४
व्यापारी – ५
हमाल तोलार – ८
एकूण उमेदवार संख्या ७०