बाजार समितीची “हाय टेन्शन” निवडणूक ठरली   “टेन्शन फ्री” ! 

बाजार समितीची “हाय टेन्शन” निवडणूक ठरली  

“टेन्शन फ्री” ! 

अनुभवाने आणि कौशल्याने निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांनी निवडणूक प्रक्रिया हाताळली कुल 

डोक्यावर बर्फ मुखी साखरेचा गोडवा घेऊन नेते मंडळींमध्ये ठेवले मैत्रीपूर्ण वातावरण…

श्री सिद्धेश्वर मतदान केंद्रावर पाहणी करताना निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२९ एप्रिल

राज्यातील विक्रमी आर्थिक उलाढालीसाठी सुप्रसिद्ध असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक चांगलीच आठवणीत राहणारी ठरली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या दोन आमदारांमध्ये लढत झाली. त्यामुळे हे इलेक्शन अतिशय हॉट होते. परंतु याच निवडणुकीत सोलापूर जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी पद भूषवत सदरची निवडणूक प्रक्रिया अतिशय कुलपणे पार पाडली. त्यामुळे या निवडणुकीत त्यांनीच मार्केट मारल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

    दरम्यान, राज्याचे माजी सहकार मंत्री राहिलेले आमदार गुरू सुभाष देशमुख आणि त्यांच्याच विरोधात त्यांचेच शिष्य म्हणून ओळख असलेले आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यात निवडणूक झाली. सोलापूरच्या राजकारणात सुभाष देशमुख आणि सचिन कल्याणशेट्टी हे एकमेकांच्या विरोधात उभे राहतील. असे कोणाला वाटले नव्हते पण या निवडणुकीत जे जे घडायचे नव्हते ते ते सारे घडले. जे देवेंद्र फडणवीस यांना जमले नाही ते कल्याणशेट्टी यांनी करून दाखवले. दोन आमदार देशमुखांचे मनोमिलन याच निवडणुकीत पाहायला मिळाले. भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला विरोधातील काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने थेट मदत सुद्धा केली.

दोन्ही सत्तेतील आमदार, दोन्ही वजनदार नेते, त्यामुळे निश्चितच जिल्ह्यातील आमदार, राज्यातील मोठे नेते, मंत्री यांचा दबाव येणे साहजिक होते त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांच्यावर निश्चितच बर्डन होते. “साहेब कागदावरच बोलतात” ही ओळख संपूर्ण राज्यामध्ये निर्माण केलेले गायकवाड यांनी अतिशय स्ट्रिक्ट आणि पद्धतशीरपणे व मैत्रीपूर्ण वातावरणात निवडणूक हाताळली.साधातल्या साध्या कार्यकर्त्याला तसेच नेते मंडळाला देखील त्यांनी आपल्या शब्दातून नाराज केले नाही. तोंडात साखर डोक्यावर बर्फ ठेवून गायकवाड यांनी निवडणूक आनंदमय वातावरणात हाताळली.

Kiran Gaikwad 

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी आणि उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी बरोबर तीन वाजता डीडीआर कार्यालयाचे गेट बंद केले. एकूणच निवडणुकीचे तयार झालेले वातावरण पाहता, कुठेही बोगस मतदान होऊ नये यासाठी मतदानाच्या दिवशी सर्व मतदान केंद्रावर सीसीटीव्ही बसवले. दिवसभर त्या सीसीटीव्ही मधून मतदानावर वॉच ठेवला. स्वतः अनेक मतदान केंद्रांना भेटी देत कुठेही गोंधळ होऊ नये याची काळजी घेतली. शहरातील सर्वाधिक मतदान असलेल्या श्री सिद्धेश्वर मतदान केंद्रावर काही काळ तळ ठोकून होते. येथे हमाल तोलार व व्यापारी मतदारसंघाचे जवळपास दोन हजारहून अधिक मतदान होते. या मतदारसंघावर कार्यकर्त्यांची तसेच उमेदवारांची वर्दळ मोठ्या प्रमाणात होती. येथे देखील पोलिसांच्या सहकार्याने सर्वत्र नियंत्रण ठेवले.

    सायंकाळी ठीक पाच वाजता मतदान केंद्र बंद करून पेट्या सील केल्या. मतमोजणी सुद्धा शहराच्या बाहेर घेऊन कोणताही गोंधळ होणार नाही. याची दक्षता घेतली. ही निवडणूक नियोजनबद्धरीत्या पार पाडल्याने मतमोजणी दिवशी सुद्धा कोणताही गोंधळ झाला नाही. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड शिस्तीच्या कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

चेअरमन निवड तीस दिवसांच्या कालावधीत करणे बंधनकारक 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे पंचवार्षिक संचालक मंडळ यांची निवडणूक संपन्न झाली. सदरच्या निवडणुकीत सत्ताधारी कल्याण शेट्टी माने व हासापुरे गटाचे वर्चस्व राहिले. निवडून आलेल्या संचालक मंडळांमधून सभापती व उपसभापती यांची निवड तीस दिवसांच्या कालावधीत करणे बंधनकारक राहणार आहे. सर्व संचालकांच्या एकमताने सदरची निवड ही बिनविरोध झाल्यास, त्याचा अहवाल जिल्हा उपविबंधक कार्यालयाकडे सादर करावा लागणार आहे. मात्र संचालक मंडळांमध्ये एक मत झाले नाही. तर मात्र संचालक मंडळामध्ये पुन्हा एकदा सभापती व उपसभापती यांच्यासाठी निवडणूक घ्यावी लागणार आहे. या प्रक्रियेसाठी सुमारे एक महिन्यांचा काळ नूतन संचालकांकडे असणार आहे. या कार्यकाळात पॅनल मधील सर्व संचालकांनी सर्वानुमते निर्णय घेऊन सभापती व उप सभापती यांची निवड केली जाईल. एकमत न झाल्यास अन्यथा संचालक मंडळांच्या निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *